Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमेरिकेतील बारमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, ४ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी

Shooting
, सोमवार, 13 ऑक्टोबर 2025 (10:55 IST)
अमेरिकेतील एका बारमध्ये रविवारी पहाटे गोळीबार झाला, त्यात ४ जणांचा मृत्यू झाला आणि २० जण जखमी झाले. अशी माहिती सामोरे आली आहे. अचानक झालेल्या गोळीबारामुळे घाबरलेले लोक आश्रयासाठी धावत होते.
ALSO READ: ठाकरे कुटुंबातील राजकीय 'मेजवानी', उद्धव ठाकरे-राज यांची ३ तासांची बंद दाराआड चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना शहरातील एका बारमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार झाला. या अंदाधुंद गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमींवर सध्या उपचार सुरू आहे. जखमींची संख्या सध्या २० इतकी आहे, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. तसेच ही घटना दक्षिण कॅरोलिना येथील सेंट हेलेना बेटावरील गर्दीच्या बारमध्ये घडली, जिथे मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की गोळीबारामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही, परंतु ते संशयितांचा शोध घेत आहे.  
ALSO READ: टेक्सासमध्ये विमान ट्रकवर आदळले; दोघांचा मृत्यू;

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लातूर जिल्ह्यात दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक मध्ये अनेक जण जखमी, पोलिस बंदोबस्त तैनात