श्रीलंकेतील 100 शहरांनी सिगारेट विक्रीवर बहिष्कार टाकला आहे.याबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लोकांना धुम्रपानामुळे होणारं नुकसान सांगण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत लोकांना जागरुक करत शिक्षित करण्यात येत आहे. याचा परिणाम असा झाला की, अनेक शहरांमधील दुकान मालक आणि व्यवसायिकांनी सिगारेटची विक्री बंद केली.
जाफना येथील 22, मतारा येथील 17 आणि कुरुनेगाला येथील 16 शहरांनी सिगारेट विक्रीवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. सध्या 107 शहरं या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत.