Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

दक्षिण जपान बेटांवर जोरदार भूकंप, त्सुनामीचा इशारा

earthquake
, मंगळवार, 24 सप्टेंबर 2024 (08:12 IST)
जपानच्या हवामान संस्थेने टोकियोच्या दक्षिणेकडील दुर्गम बेटांसाठी मंगळवारी सुनामीचा इशारा जारी केला. शक्तिशाली भूकंपानंतर हा इशारा देण्यात आला आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत कोणतेही नुकसान किंवा लोक जखमी झाल्याची कोणतीही बातमी नाही. 

इझू बेटाच्या किनारी भागातील रहिवाशांना मंगळवारी सकाळी 5.9 तीव्रतेचा भूकंप जाणवला, हवामान संस्थेने सांगितले की, या भागात एक मीटरपर्यंत लाटा येण्याची त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. एजन्सीने असेही म्हटले आहे की चाचिजो बेटाच्या यानेन भागात सुमारे 50 सेंटीमीटरची छोटी त्सुनामी दिसली. हाचिजो बेटाच्या दक्षिणेला सुमारे180 किलोमीटर अंतरावर हा सागरी भूकंप झाला. हे ठिकाण राजधानी टोकियोच्या दक्षिणेस सुमारे 300 किलोमीटर अंतरावर आहे. 

जपानचा पॅसिफिक महासागर प्रदेश भूकंप आणि ज्वालामुखीसाठी अत्यंत संवेदनशील आहे. त्याला 'रिंग ऑफ फायर' असेही म्हणतात.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीने स्वतःवर गोळी झाडली