Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वैद्यकीय मदतीसाठी पाकिस्तानमधील प्रत्येक व्यक्तीला व्हिसा देऊ

Webdunia
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017 (10:58 IST)

वैद्यकीय मदतीची आवश्यकता असलेल्या पाकिस्तानमधील प्रत्येक व्यक्तीला व्हिसा दिला जाईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपण ही घोषणा करत असल्याचेही स्वराज यांनी सांगितले. पाकिस्तानमधील अनेक नागरिक वैद्यकीय मदतीसाठी स्वराज यांच्याकडे ट्विटरवरुन मदत मागतात. यावर भाष्य करताना त्यांनी ही माहिती दिली.

पाकिस्तानच्या नागरिक असलेल्या आमना शमीन यांनी वैद्यकीय उपचारांसाठी ‘मेडिकल व्हिसा’ देण्याची मागणी सुषमा स्वराज यांच्याकडे केली होती. शमीन यांच्या विनंतीला स्वराज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘कृपया पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तांशी संपर्क साधा. आम्ही यासाठी आवश्यक परवानगी देऊ,’ असे स्वराज यांनी म्हटले.   ‘दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मेडिकल व्हिसासाठी प्रलंबित असलेल्या अर्जांना मंजुरी देण्यात येईल. कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या सर्व अर्जदारांना सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल,’ असे ट्विट स्वराज यांनी केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने चार महत्त्वाचे निर्णय घेतले

आदिवासी वसतिगृहाचा मुद्दा तापला, सरकारला १० दिवसांचा अल्टिमेटम दिला

अफगाणिस्तान मालिकेसाठी भारतीय टी२० संघ जाहीर, वैभवला संधी

केएमपी द्रुतगती मार्गावर भरधाव वेगातील पिकअप ट्रकला धडकल्याने सहा भाविकांचा मृत्यू

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सर्वोच्च न्यायालयाकडून एक मोठी घडामोड

पुढील लेख
Show comments