Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तेलंगणाच्या राहणारा 26 वर्षाच्या विद्यार्थ्याचे अमेरिकेत गोळी घालून हत्या

telangana student
वारंगल , सोमवार, 13 फेब्रुवारी 2017 (13:13 IST)
तेलंगानात राहणार्‍या 26 वर्षाच्या युवकाची अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. ममिडाला वामशी चंदर रेड्डी नावाच्या या युवकाच्या पित्याने दिलेल्या माहितीनुसार गोळी मारणारा शख्स कार चोरणारा होता आणि ही घटना शनिवारी सकाळी झाली जेव्हा वामशी कॅलिफोर्नियाच्या मिलपिटासच्या एका स्थानीय स्टोअरवर आपले पार्ट टाइम शिफ्ट करून परतत होता.  
 
वामशीचे वडील संजीव रेड्डी यांना भारतात फोनवर या अपघाताची माहिती मिळाली. ते म्हणाले 'वामशीच्या मित्रांनी मला फोन करून सांगितले की माझा मुलगा गायब आहे आणि नंतर त्यांनी सांगितले की वामशीचा मृत्यू झाला आहे.'
 
वामशी 2013मध्ये कॅलिफोर्निया गेला होता जेथे त्याने सिलिकॉन वॅली युनिव्हर्सिटीहून आपल्या एमएसचा अभ्यास पूर्ण केला होता. तो सॉफ्टवेयर इंडस्ट्रीत नोकरी शोधत होता आणि या दरम्यान त्याने एका स्टोरमध्ये पार्ट टाइम नोकरी सुरू केली होती. रेड्डी यांनी सांगितले की 'त्याच्या मित्रांचे म्हणणे आहे की एका कार चोराने वामशीवर तेव्हा गोळी झाडली जेव्हा तो चोर एका महिलेच्या कार ला पार्किंग गॅरेजमधून चोरून पळत होता.' रेड्डी यांनी सांगितले की त्यांनी काही दिवस अगोदरच आपल्या मुलाशी गोष्टी केल्या होत्या.  
 
आपल्या अश्रूंवर काबू ठेवत रेड्डी यांनी सांगितले 'त्याला तेथे नोकरी मिळण्याची काळजी होती. मी त्याला म्हटले होते की येथे येऊन जा आणि येथेच नोकरी कर. त्यावर तो म्हणाला होता की मी लवकरच परत येईल पण त्याच्याबरोबर असे काही घडेल हे माहीत नव्हत.'
 
रेड्डी यांनी तेलंगाना आणि केंद्र सरकारला अपील केली आहे की ते वामशीचे मृतदेह लवकरात लवकर भारतात पाठवावे. स्थानीय विधायक अरूरी रमेश यांनी वामशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना भरवसा दिला की वामशीच्या मृतदेहाला लवकरात लवकर येथे आणण्याचा प्रयत्न करतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्तर कोरियाकडू क्षेपणास्त्राची चाचणी