Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभिनेत्रीचा मृतदेह गोणीत सापडला, पतीने गुन्ह्याची कबुली दिली

The actress' body was found in a sack
, बुधवार, 19 जानेवारी 2022 (13:34 IST)
काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली बांगलादेशी अभिनेत्री रायमा इस्लाम शिमूचा मृतदेह सापडला आहे. ढाक्यातील केरानीगंज येथील एका पुलाजवळ तिचा मृतदेह एका गोणीत सापडला. सोमवारी 17 जानेवारी रोजी कदमटोली भागातील अलीपूर पुलाजवळ त्या भागातील स्थानिक लोकांना अभिनेत्रीचा मृतदेह दिसला आणि त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली.
 
रायमाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अभिनेत्रीच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आहेत. हत्येनंतर रायमा इस्लाम शिमूचा मृतदेह गोणीत बांधून रविवारी पुलाजवळ फेकून दिला होता. एका उच्च पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी  रुग्णालयात  पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
 
अभिनेत्री शिमू बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी रविवारी कालाबागन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून अभिनेत्रीचा पती शाखावत अली यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अलीसह त्याच्या चालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
 
ढाका पोलिसांना दिलेल्या अधिकृत निवेदनात अभिनेत्रीच्या हत्येमागील कारण कौटुंबिक वाद असल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी, आता दिवंगत अभिनेत्रीच्या पतीने खुनाची कबुली दिली आहे. ढाक्याच्या वरिष्ठ न्यायदंडाधिकारी यांनी मंगळवारी शिमूचा पती शाखावतअलीम नोबेल आणि त्यांचा मित्र एसएमवाय अब्दुल्ला फरहाद यांना चौकशीसाठी कोठडी सुनावली.

 45 वर्षीय अभिनेत्रीने 1998 मध्ये 'बार्तामन' चित्रपटातून पदार्पण केले होते. तेव्हापासून त्यांनी 25 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मयत अभिनेत्री बांगलादेश फिल्म आर्टिस्ट असोसिएशनची सहयोगी सदस्य होती. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी टीव्ही नाटकांमध्येही अभिनय केला आणि निर्मिती केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

28 फेब्रुवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद राहणार, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये मोठा निर्णय