दैव तारी त्याला कोण मारी. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. असं घडलं आहे लंडन येथे .चमत्कार आजदेखील होतात ह्याचा प्रत्यय आला आहे लंडन मध्ये. एका प्री-मॅच्युर बाळाचा जन्म झाला आणि त्याच्या हृदयाचे ठोके 17 मिनिटासाठी बंद पडले. डॉक्टरांनी नियतीच्या पुढे हात टेकले ते निराश झाले. बाळाच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला. परंतु खरा चमत्कार येथे झाला. ते बाळ आता सुखरूप बरा होऊन त्याचा घरी परतला आहे.
बाळाची आई बेथानी होमरने एका वृत्तपत्राला सांगितले की, ती 26 आठवडे आणि तीन दिवसांची गरोदर राहिल्यानंतर तात्काळ सिझेरियनसाठी नेण्यात आले तेव्हा तिच्या बाळाच्या जगण्याची शक्यता जास्त नव्हती. अशा परिस्थितीत तिला प्लेसेन्टल ऍबॉर्शनला सामोरी जावे लागले. अशा परिस्थितीत बाळाच्या जन्मापूर्वी प्लॅसेंटा गर्भाशयापासून वेगळे केले जाते. हे बाळाच्या जीवनासाठी धोकादायक असत.
बाळाच्या आईने सांगितले की, जन्माच्या वेळी बाळाचे वजन फक्त 750 ग्राम होते आणि त्याच्या हृदयाचे ठोके 17 मिनिटे बंद पडले. त्यानंतर बाळाचा श्वासोच्छ्वास सुरु झाला. त्याला जिवंत ठेवण्यासाठी रक्त देण्यात आले. स्कॅन केल्यावर बाळाच्या मेंदूत काहीही त्रुटी आढळली नाही. बाळाला रुग्णालयात देखरेख खाली ठेवण्यात आले. तब्बल 112 दिवसांनंतर बाळाला सुखरूप घरी आणले. बाळाला अद्याप ऑक्सिजन पुरवठा द्यावा लागत आहे. डॉक्टरांनी म्हटले की.बाळाला जीवनदान देण्यात यश मिळाले. ते 17 मिनिटे महत्त्वाची असल्याचे डॉक्टरांनी सांगितले अन्यथा अघटित घडू शकले असते. बाळाच्या हृदयाला एक छिद्र असून एक व्हॉल्व्ह उघडे आहे. त्यामुळे बाळाची काळजी घ्यावी लागेल.
बाळाच्या आईला बाळाच्या जन्माच्या वेळी सांगितले की. प्रसूतीच्या वेळी परिस्थिती नाजूक असल्यामुळे बाळाचा मृत्यू पोटातही होऊ शकतो किंवा बाळा जन्मतः दगावू शकतो अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती. आईची प्रसूती अचानक करावी लागल्यामुळे बाळाच्या हृदयाचे ठोके बंद पडले आणि नंतर 17 मिनिटानंतर पुन्हा बाळ जिवंत होणे हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.