Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या देशात आहे जगातलं खरंखुरं 'ज्युरासिक पार्क'

Webdunia
शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (22:48 IST)
ज्युरासिक पार्क हा चित्रपट पाहिलेला नाही असं क्वचितच कोणी असेल.त्यातले डायनासोर जेव्हा माणसांवर आक्रमण करू लागतात तेव्हा भीती वाटली नाही असाही कोणी सापडणार नाही.पण सिनेमातलं ज्युरासिक पार्क खरंच अस्तित्वात आलं तर? तुम्ही जाल का ते पहायला?
 
पोर्तुगा मधल्या या ठिकाणी खरंखुरं ज्युरासिक पार्क आहे. फरक इतकाच की इथे अतिभव्य असे डायनासोर बागेत फिरल्यासारखे फिरत नाहीत आणि टी रेक्स तुम्हाला पनीरचा तुकडा मोडल्यासारखं खाऊन टाकत नाहीत.
 
पोर्तुगालमधल्या लुरींगहाना प्रदेशातल्या पामिंगो या ठिकाणी 1991 साली डायनासोरचं एक घरटं सापडलं होतं.
 
या घरट्यात तब्बल 100 अंडी सापडली होती.
 
ही लुरींगहानासोरस नावाच्या एका मांसभक्षक डायनासोरची होती. हा डायनासोर फक्त या प्रदेशात आढळायचा.
 
जेव्हा हे घरटं सापडलं तेव्हा ते जगातलं सर्वात जुनं डायनासोरचं घरटं होतं.
 
हाओ रूसो एक डायनासोरतज्ज्ञ आहेत.
 
ते म्हणतात, "इथे सापडलेल्या अंड्यांचे जीवाश्म जवळपास 150 दशलक्ष वर्षं जुने आहेत."
 
हे घरटं इतकं जुनं असल्यामुळे खास आहे.
 
पण इथे नुसत्या अंड्यांचे जीवाश्म सापडले नाहीत, तर काही अंड्यांच्या आता डायनासोरचं भ्रूण ही सापडलं आहे.
 
इथे जे जीवाश्म सापडले त्यातली ही सगळ्यात आगळीवेगळी गोष्ट आहे.
 
याबद्दल अधिक माहिती देताना डॉ मिगेल मोरेनो - अझाना हे डायनासोर तज्ज्ञ म्हणतात, "आपल्याला आजमितीला डायनासोरच्या जवळपास 1500 जाती माहिती आहेत. त्यापैकी फक्त 20 जातींचे भ्रूण सापडले आहेत. त्यापैकी 2 इथे सापडले आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे.”
 
ते पुढे म्हणतात, "एक भ्रूण सापडणं पण दुर्मीळ गोष्ट आहे, पण लुरिंगहानामध्ये अशी अनेक भ्रूणं आहेत."
 
या शोधामुळे लुरिंगहानाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलं.
 
इथल्या डायनासोर्सचा इतिहास
जवळपास 150 दशलक्ष वर्षांपूर्वी लुरिंगहानामधल्या डोंगररांगांच्या जागी मैदानी प्रदेश होता आणि इथून अनेक नद्या वाहायच्या.
 
"हा भौगोलिक प्रदेश डायनासोर्ससाठी खूप उपयुक्त होता," रूसो म्हणतात.
 
"इथे शाकाहारी डायनासोर्ससाठी भरपूर वनस्पती उपलब्ध होत्या, मांसाहारी डायनासोर्ससाठी लहानमोठे प्राणी होते. आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे इथली भूगर्भीय रचना अशी होती, की डायनासोर्स नष्ट झाल्यानंतरही पुढची 150 दशलक्ष वर्षं त्यांचे जीवाश्म मानवाला सापडेपर्यंत इथे नीट राहिले," रूसो पुढे म्हणतात.
 
इथे पावलापावलावर डायनासोरचे जीवाश्म सापडतात.
 
मायकल मारींतो डायनासोरचे अवशेष शोधण्याचं काम करतात.
 
ते आम्हाला माहिती देत या भागात फिरवत होते तेव्हाच त्यांना प्राचीन काळातल्या मगरीचा एक दात सापडला.
 
2018 साली या भागात सापडलेलं डायनासोरचं एक घरटं शोधण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती.
 
त्या मोहिमेची माहिती देताना ते म्हणतात, "आम्ही जीवाश्म शोधत कानिकल समुद्र किनाऱ्यावर फिरत होतो, आम्हाला समुद्र किनारी अंड्यांचे दोन अवशेष दिसले. त्या जवळ असलेल्या टेकडीवर आम्ही उत्खनन सुरू केलं. ते अवशेष कुठून आले हे आम्हाला शोधायचं होतं. हळूहळू आम्हाला अंड्याचे आणखी अवशेष दिसायला लागले. एवढे अवशेष एकाच ठिकाणी साप अर्थ स्पष्ट होता, जवळच डायनोसोरचं घरटं असणार."
 
पण या घरट्यातले जीवाश्म बाहेर काढणं सोपं नव्हतं.
 
डॉ मिगेल मोरेनो-अझना म्हणतात, "तो उभा कडा होता. तिथे चढायला किंवा चालायला जागा नव्हती. आम्हाला आधी तिथे चढण्यासाठी वाट तयार करावी लागली जेणेकरून आम्हाला सुरक्षितपणे काम करता येईल. तिथे दोरखंड लावून आम्ही चढायचो आणि काम करायचो."
 
तिथे काळजीपूर्वक उत्खनन केल्यावर त्याला एक मोठा खडक सापडला ज्यात जीवाश्म होते.
 
रूसो म्हणतात, "त्याचं वजन एक टन असावं. तो एवढा अवजड होता की त्याला उचलणारं मशीन मोडून पडेल की काय अशी आम्हाला भीती वाटली. पण सुदैवाने त्या खडकात असलेलं घरटं आम्ही सुरक्षितपणे बाहेर काढू शकलो."
 
ते घरटं बाहेर काढल्यानंतर प्रयोग शाळेत पाठवण्यात आलं. त्यावर आता पुढचं संशोधन होतंय.
 
कार्ला टोमास लूरिंगहाना संग्रहालयाच्या प्रयोगशाळेच्या संचालक आहे.
 
त्या म्हणतात, "त्या घरट्यातून अंडी वेगळी करणं हे खूप नाजूक आणि अवघड काम आहे. ब्रश आणि बारीक हातोड्यांनी आम्हाला हे काम करावं लागतंय. एकदा अंडी वेगळी झाली की त्यांचा आणखी अभ्यास करता येईल."
 
तज्ज्ञांना आशा आहे की या घरट्यात सापडलेल्या अंड्यांमध्ये भ्रूण किंवा त्यांची हाडं सापडतील.
 
लुरींगहाना मध्ये आधीही अशी दोन घरटी सापडली होती ज्यात भ्रुणांची हाडं होती.
 
एका घरट्यात टॉर्वोसोर जातीच्या डायनासोरचं भ्रूण आढळलं होतं. हा डायनोसोर युरोपात सापडणारा सर्वात मोठा मांसभक्षक प्राणी होता. हा डायनासोर टी-रेक्सच्या 85 दशलक्ष वर्षं आधी पृथ्वीवर वावरत होता.
 
टॉर्वोसोर साधारण 10 मीटर लांब होता. रूसो म्हणतात, "हा सर्वात मोठा शिकारी प्राणी होता."
 
डायनासोरच्या अंड्यातल्या भ्रूणाचे अवशेष सापडणं का गरजेचं आहे या प्रश्नाचं उत्तर देताना मिगेल म्हणतात, "डायनोसोर जवळपास 100 दिवस अंड्यात राहून विकसित होत असतात. पण त्यांची हाडं अगदी शेवटी शेवटी तयार होतात, त्यामुळे आजवर भ्रूणाची हाडं जीवाश्म स्वरूपात सापडलेली नाहीत. पण लुरींगहाना मध्ये दोनदा सापडलेली आहेत. तेही दोन वेगवेगळ्या जातींची."
 
इथे सापडलेल्या टॉर्वोसोर आणि लुरींगहानासोरस दोन्ही जातींच्या अंड्यांची तुलना करत आहेत.
 
“टॉर्वोसोरच्या अंड्याचं कवच आधीच्या काळात पृथ्वीवर वावरत असलेल्या डायनासोरच्या अंड्याशी मिळतं जुळतं आहे,तर लुरींगहानासोरस जातीच्या अंड्याचं कवच उडत्या डायनोसोरशी मिळतं जुळतं आहे. उडत्या डायनोसोरपासूनच पुढे पक्षी उत्क्रांत झाले,” मिगेल म्हणतात.
 
डायनासोरची ही अंडी सापडल्यामुळे उत्क्रांतीच्या अभ्यासातलं नवं प्रकरण खुलं झालं आहे असंही त्यांना वाटतं. “या संशोधनातून जगाला खूप साऱ्या नव्या बाबी समजतील,” ते म्हणतात.
 















Published By- Priya Dixit
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही-शरद पवार

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली

सरकार बनताच 'लाडक्या बहिणींना' मिळणार 2100 रुपये-अमित शाह

महाराष्ट्रात निवडणूक उड्डाण पथकाने गाडी अडवून व्यावसायिकाकडून पैसे उकळले, 2 पोलिसांसह 5 जणांविरुद्ध एफआयआर

पुढील लेख
Show comments