Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

बगदादमधील US दूतावासावर हल्ला, तीन रॉकेट टाकण्यात आले : इराक सेना

बगदादमधील US दूतावासावर हल्ला, तीन रॉकेट टाकण्यात आले : इराक सेना
, गुरूवार, 8 जुलै 2021 (08:39 IST)
इराकची राजधानी बगदादमध्ये गुरुवारी (US embassy in Baghdad) बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासावर तीन रॉकेट टाकण्यात आले. इराकच्या सैन्याने या हल्ल्याची माहिती दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे की दोन दिवसांपूर्वी अमेरिकन सैन्याने दूतावासाशेजारी फिरणारे ड्रोन नष्ट केले होते.यापूर्वी इराकी एअरबेसवर अमेरिकन सैन्याच्या जवानांवर 14 रॉकेट हल्ले करण्यात आलेहोते. यात दोन लोक जखमी झाले होते. इराकबरोबरच सीरियामध्येही अमेरिकन सैन्याला लक्ष्य केले जात आहे.
 
वृत्तानुसार बगदादच्या ग्रीन झोन भागात दोन रॉकेट पडले होते. ग्रीनझोनमध्ये बरीच परदेशी दूतावासाची आणि सरकारी इमारती आहेत. दूतावासाच्या अँटी रॉकेट सिस्टमने रॉकेट वळविला होता, तो ग्रीन झोनजवळ पडला होता. या हल्ल्याची अद्याप कुणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. परंतु तज्ञांचे मत आहे की हे हल्ले इराणी समर्थीत मिलिशियाने केले आहेत.
 
गेल्या आठवड्यात अमेरिकेने अनेक लष्करी तळांवर हवाई हल्लेही केले. या हल्ल्यात त्याचे चारलोक मरण पावले. इराक-सीरिया सीमेवर अमेरिकेने हे हल्ले केले. तथापि, इराक आणि सिरियामधील अमेरिकी सैन्यावरील हल्ल्यांना इराणने पाठिंबा दर्शविला नाही. परंतु अमेरिकेने इराण समर्थित गटांवर केलेल्या हल्ल्यांचा निषेधही केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Happy Birthday Sourav : क्रिकेटपटूंनी सौरव गांगुलीच्या 48 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या