Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमेरिका : केंटकीमध्ये चक्रीवादळामुळे 50 जण ठार झाल्याची भीती

US: Hurricane Kentucky kills at least 50 अमेरिका : केंटकीमध्ये चक्रीवादळामुळे 50 जण ठार झाल्याची भीतीMarathi International News  In Webdunia Marathi
, शनिवार, 11 डिसेंबर 2021 (22:00 IST)
अमेरिकेच्या केंटकी भागामध्ये आलेल्या भयानक वादळामुळे आतापर्यंत 50 जणांचा जीव गेला असल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.
हा आतापर्यंतचा सर्वात विनाशकारी टॉर्नेडो (Tornado) म्हणजेच चक्रीवादळ असल्याचं राज्याचे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी म्हटलंय.
मृतांचा आकडा 100 पर्यंत पोहोचण्याची भीती त्यांनी व्यक्त केलीय.
अमेरिकेच्या अनेक भागांना चक्रीवादळांचा तडाखा बसतोय. या चक्रीवादळामुळे इल्यनॉय मधल्या अॅमेझॉन कंपनीच्या गोदामाचं मोठं नुकसान झालंय. इथे अनेक कर्मचारी अडकलेले आहेत.
चक टॉर्नेडोचा तडाखा बसलेल्या केंटकीमधल्या मेफील्ड मधल्या मेणबत्त्या बनवणाऱ्या कारखान्यातही किमान 100 जण अककलेले आहेत. यापैकी डझनभरांचा जीव गेल्याची भीती असल्याचं बेशियर यांनी म्हटलंय.
शुक्रवारी (10 डिसेंबर) रात्री आलेल्या वादळाने इल्यनॉयमधल्या अॅमेझॉनच्या गोदामाची पडझड झाली. इथलं छप्पर कोसळल्याने किती जण जखमी झाले आहेत हे समजू शकलेलं नाही. पण इथे मोठं नुकसान झाल्याचं स्थानिक यंत्रणांनी फेसबुकवर म्हटलंय.
जोरदार वाऱ्यांमुळे होपकिन्स काऊंटीमध्ये एक रेल्वे रुळांवरून घसरली आहे.
आर्कन्सामध्ये वादळामुळे एका नर्सिंग होमचं नुकसान झालं. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. वादळ आल्याने या इमारतीतले लोक बेसमेंटमध्ये लपले होते. त्याचवेळी ही इमारत कोसळली.
आर्कन्सा, टेनेसी, मिसुरी आणि इल्यनॉयमध्ये वादळं येण्याचा इशारा अमेरिकेच्या हवामान खात्याने दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओमिक्रॉन विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितला हा पर्याय