या भेटीनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन भेटीनंतरचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तान सरकारचे आभार मानले आहेत. ते म्हणतात की आई व पत्नीला भेटू द्यावं अशी विनंती मी पाकिस्तानच्या सरकारकारला केली होती तेव्हा त्यांनी माझी ही विनंती मान्य केली त्यासाठी मी पाकिस्तान सरकारचे आभार मानतो आहे.