Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

काय म्हणता, चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात जलद सुधारणा

काय म्हणता, चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात जलद सुधारणा
, गुरूवार, 16 जुलै 2020 (21:54 IST)
सध्या चीनची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत आहे. कोरोना महामारीस सुरूवात झाल्यानंतर अर्थव्यवस्थेत सुधारणा झालेला चीन हा पहिला देश ठरला आहे. लॉकडाउन उठवण्यात आल्यानंतर येथील उद्योगधंदे सुरू झाले व मागील तिमाहित अर्थव्यवस्थेत अनपेक्षितरित्या ३.२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
 
जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल, मे आणि जून महिन्यामध्ये चीनची अर्थव्यवस्था बऱ्याच प्रमाणात सावरल्याचे चित्र दिसलं आहे. मागील तिमाहीमध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेला करोनामुळे मोठा फटका बसला होता. मागील तिमाहीत अर्थव्यवस्थेचा दर ६.८ इतका होता. १९६० पासूनचा हा अर्थव्यवस्थावाढीचा सर्वात संथ दर असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.
 
डिसेंबरमध्ये करोना व्हायरस महामारीला सुरूवात झाल्यानंतर अर्थव्यवस्था ठप्प झालेला चीन हा पहिला देश होता. मार्च महिन्यात सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने करोनावर नियंत्रण मिळवण्याचं जाहीर केल्यानंतर अर्थव्यवस्था सावरण्याची प्रक्रिया सुरू करणाराही पहिला देश ठरला.  राष्ट्रीय अर्थव्यवस्था २०२० च्या पहिल्या सहामाहीत मंदीकडून वाढीच्या दिशेने वाढत गेली, असे राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोने एका निवेदनात म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी कर्नाटक सरकार ५ हजार रुपये देणार