Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमेरिका-चीन : उपग्रहांच्या काळात सर्वेक्षणासाठी फुगा का वापरतात?

Webdunia
शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (22:41 IST)
गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या आकाशात एक हॉट एअर बलून दिसला, आणि अमेरिकेला वाटलं तो चीनसाठी हेरगिरी करतोय.त्यांनी नंतर तो लक्ष्य करून पाडला. तेव्हापासून अमेरिका आणि चीनमध्ये एक वेगळाच तणाव निर्माण झाला. पण एक प्रश्न पडतो - सॅटलाईटच्या काळात कुणी असा फुगा का वापरेल?
 
नेमकं काय घडलं?
हे सगळं सुरू झालं 3 फेब्रुवारीला. अमेरिकेच्या मोंटाना राज्यात असा एक हॉट एअर बलून दिसला, ज्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली.
मोंटानामधील रहिवासी चेस डोक यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "मला एकीकडे आकाशात काहीतरी दिसलं. आधी मला वाटला हा कुठला तारा आहे, पण दिवसाढवळ्या एवढा मोठा तारा कसा दिसेल?"
हा फुगा त्याआधीच्या काही दिवसांमध्ये अलास्का, मग कॅनडामध्येही दिसला होता. पण अमेरिकेच्या एअरस्पेसमध्ये येताच शंका व्यक्त करण्यात आली, की हे चीनकडून आलेलं हेरगिरीचं यंत्र आहे आणि त्याचा धोका वाटल्यास आम्ही त्याला पाडून टाकू.
 
मग चीनने स्पष्ट केलं की, तो फुगा आणि ते यंत्र हवामान विभागासाठी माहिती गोळा करण्याचं काम करतं आणि ते हेरगिरीसाठी नाही.
 
चीनने "आपल्या वाट भरकटलेल्या" या फुग्यासाठी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली, पण तोपर्यंत तणाव वाढलेला होता. कारण त्यानंतरच्या 24 तासात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन हे चीनला जाणार होते, पण त्यांनी त्यांचा दौरा रद्द केला.
ब्लिंकन म्हणाले, "चीनच्या या आक्षेपार्ह कृत्यानंतर मी चीनला येत्या वीकेंडला माझा नियोजित दौरा रद्द करतोय... हे अतिशय बेजबाबदारपणाचं कृत्य आहे, आणि माझ्या दौऱ्याच्या एक दिवस आधी चीनच्या या निर्णयामुळे आमच्या ठरलेल्या चर्चा होऊ शकणार नाहीत."
 
नंतर गेल्या शनिवारी अमेरिकेने एका F-22 फायटर जेटच्या मदतीने त्या यंत्राला लक्ष्य करून खाली पाडलं. आता प्रश्न हा आहे की या फुग्यात नेमकं असं काय होतं?
हा फुगा किती धोकादायक?
अमेरिकन लष्करानुसार हा हॉट एअर बलून साधारण 200 फूट, म्हणजे 60 मीटर उंच होता. इतका मोठा की त्याचे तुकडे आणि अवशेष समुद्रात साधारण 11 किमी परिसरावर पडले. हे अवशेष चीनला परत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असंही अमेरिकेने म्हटलंय. पण यात होतं तरी काय?
 
साधारण अशा सर्वेक्षणासाठीच्या फुग्यांमध्ये हेलियम वायू भरलेला असतो, खाली सोलार पॅनेल जोडलेले असतात, जे रडार, कॅमेरा, इतर सेन्सर्स आणि संपर्क साधनांना ऊर्जा पुरवण्याचं काम करतात. कॅमेरा आणि इतर सेन्सर्स कोणते आहेत, यावरून ठरतं की त्या बलूनचं काम काय आहे.
चीनने म्हटलंय की तो फक्त हवामानासाठी माहिती गोळा करण्याचं काम करणारा फुगा होता, पण अमेरिकेचा दावा आहे की 'नाही, तो यापेक्षा बरंच काही करू शकतो, आणि हेरगिरीस सक्षम आहे.'
 
पण खरं काय?
 
युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डरमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंगचे प्रोफेसर इयन बॉइड यांच्या मते, ना बीजिंगचं म्हणणं पूर्णपणे पटणारं आहे, ना वॉशिंग्टनचं.
 
ते म्हणतात, CARD - "दोन्हीकडून इतक्या शंका उपस्थित करण्यात आल्यामुळे हे प्रकरण रंजक झालंय. आणि सत्य या सगळ्याच्या मध्ये कुठेतरी असावं."
 
पण एक प्रश्न उरतोच - आपण 2023मध्ये आहोत. आजच्या काळात फुगा कोण वापरतं? उपग्रह का नाही?
 
उपग्रह असताना फुगा का?
खरंतर हवाई सर्वेक्षणासाठी हॉट एअर बलूनचा वापर हा अनेक दशकांपासून होतोय. जपानने दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेवर बाँब टाकायला अशाच फुग्यांचा वापर केला होता. शीतयुद्धाच्या काळातही अमेरिका आणि सोव्हिएत रशिया एकमेकांवर अशा फुग्यांच्या मदतीने नजर ठेवत होते.
 
अमेरिकेसह अनेक देश स्वतःच्या हवाई क्षेत्रांवर नजर ठेवायलाही असे फुगे वापरतात, ज्यात सेन्सर्स, रडारसह अनेक यंत्र असतात. आधुनिक सर्वेलन्स बलून हे आपल्या विमानांच्या उड्डाण क्षेत्राच्याही बऱ्याच वर, 24 ते 37 किमी उंचीवर असतात.
 
पण चीन, ज्याच्याकडे इतक्या अद्ययावत गोष्टी आहेत, तो हा फुगा का वापरतंय?
दोन शक्यता आहेत - जर चीनवर खरोखरंच भरवसा ठेवला तर हा हवामानाचा फुगा आहे, जो आपली दिशा भरकटलाय. किंवा दुसरी शक्यता जी हवाई शक्ती तज्ज्ञ हे युआन मिंग बोलून दाखवतात.
 
"चीन अमेरिकेला फार तणाव न वाढवता एक संदेश देऊ इच्छितो, की पाहा, आम्ही तुमच्या हवाई क्षेत्रात येऊ शकतो. आणि हे करायला एका निष्पाप फुग्यापेक्षा आणखी काय चांगलं?"
 
पण हो, उपग्रह असताना फुग्यांद्वारे सर्वेक्षण का? तर अर्थात, याला लागणारा खर्च हा ड्रोन्स किंवा उपग्रहांपेक्षा बराच कमी आहे.
 
दुसरी गोष्ट म्हणजे, कुठलाही सॅटेलाईट आपल्या कक्षेत फिरताना कुठे थांबू शकत नाही. हॉट एअर बलून्सना एखाद्या क्षेत्रावरच घिरट्या घालणं शक्य आहे.
 
पण वॉशिंग्टन पोस्टच्या एका बातमीनुसार असेच चीनच्या निगराणी यंत्रणेचा भाग असलेली अशी सर्वेक्षण यंत्रं जपान, व्हिएतनाम, तैवान आणि भारतावरही दिसले होते. त्यामुळे याचा धोका, जर आहे, तर तो आपल्यालाही तितकाच आहे, जितका की इतर कुठल्याही देशाला.
Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणी प्रकरणावर भाजपचे प्रत्युत्तर

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा T20 कधी होणार जाणून घ्या

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi अमित शहांची उद्धव ठाकरेंवर धुळ्यात टीका, सत्तेच्या लालसेपोटी आता कुणासोबत आहे?

अमित शहांची उद्धव ठाकरेंवर धुळ्यात टीका, सत्तेच्या लालसेपोटी आता कुणासोबत आहे?

शरद आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील का? काय म्हणाले नवाब मालिक..

पुढील लेख
Show comments