Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IPL-10 मुंबईची हॅट्रिक

Webdunia
उत्कंठेचे शिखर गाठणाऱ्या आयपीएलच्या अंतिम लढतीत अखेर मुंबईकर पुण्याला भारी पडले. माफक धावसंख्येचा बचाव करताना गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंट्सला अवघ्या एका धावेने पराभूत केले  आणि आयपीएल 10 च्या विजेतेपदावर कब्जा केला.  मुंबईचे आयपीएलमधील हे तिसरे विजेतेपद ठरले आहे. त्याबरोबरच आयपीएलमध्ये तीन विजेतेपदे पटकावणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला आहे.  
 
मुंबईने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पुण्याने सावध सुरुवात केली. सलामीवीर राहुल त्रिपाठी (3)  स्वस्तात माघारी परतल्यावर अजिंक्य रहाणे आणि स्टीव्हन स्मिथ यांनी संयमी खेळ करत पहिल्या 10 षटकांत पुण्याला 1 बाद 58 धावांपर्यंत मजल मारून दिली.  त्यानंतरही या दोघांचा संयमी खेळ सुरू ठेवला.  मात्र सुरेख फलंदाजी करत असलेल्या रहाणेची (44) विकेट काढत मिचेल जॉन्सनने मुंबईला सामन्यात पुनरागमन करून दिले. 
 
रहाणे बाद झाल्यावर मुंबईच्या गोलंदाजांनी स्मिथ आणि धोनीला जखडून टाकले. मात्र पुण्याच्या हाती 8 गडी असल्याने पुण्याचे पारडे जड होते. अखेर डावातील 14 व्या षटकात धोनी आणि स्मिथने 14 धावा वसूल केल्या. पण धोनी बाद झाल्यावर मुंबईच्या गोलंदाजांनी गोलंदाजीची धार वाढवत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला.  शेवटच्या षटकात पुण्याला विजयासाठी 11 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर मनोज तिवारीने चौकार मारला. मात्र जॉन्सनने पुढच्या दोन चेंडूवर तिवारी (7)  आणि स्टीव्हन स्मिथ (51) यांना बाद केले. तर शेवटच्या चेंडूवर चार धावांची आवश्यकता असताना जॉन्सनने केवळ दोन धावा देत मुंबईला एका धावेने थरारक विजय मिलवून दिला. मुंबईकडून जॉन्सनने तीन, तर बुमराने दोन गडी बाद केले. 
 
तत्पूर्वी आयपीएलच्या महाअंतिम लढतीत पुण्याच्या गोलंदाजांनी मुंबईकरांना कात्रजचा घाट दाखवला. जयदेव उनाडकट, अॅडम झम्पा आणि डॅन ख्रिस्टियान  यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंट्सने मुंबईला 20 षटकांत 8 बाद  129 धावांवर रोखले.
 
 सात बाद 79 अशी बिकट अवस्था  झालेल्या मुंबईला कृणाल पांड्याने सावरले. 38 चेंडूत 47 धावांची खेळी करणाऱ्या  कृणालने  मिचेल जॉन्सनच्या साथीने आठव्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी करत मुंबईला सव्वाशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. पुण्याकडून उनाडकट, झम्पा आणि ख्रिस्टियान यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. 
 
 आयपीएल 10 च्या  अंतिम लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. जयदेव उनाडकटने भेदक मारा करत सुरुवातीलाच पार्थिव पटेल (4) आणि लेंडल सिमॉन्स (3) या मुंबईच्या सलामीवीरांना परतीची वाट दाखवली.  पुण्याच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे मुंबईला पहिल्या पाच षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात केवळ 16 धावा जमवता आल्या होत्या. अशा परिस्थितीत  कर्णधार रोहित शर्माने आक्रमक पवित्रा घेत पुण्याच्या गोलंदाजांवर जोरदार प्रतिहल्ला करत दबाब कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहितचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. 
 
मुंबईचा संघ सावरतोय असे वाटत असतानाच रायडू 12 धावा काढून बाद झाला. त्यानंतर  रोहित (24) आणि कायरन पोलार्ड (7) पाठोपाठ बाद झाल्याने मुंबईचा डाव पुरता अडचणीत आला. पाठोपाठ हार्दिक पांड्या (10) आणि कर्ण शर्माही माघारी परतल्याने मुंबईची अवस्था 7 बाद 79 अशी झाली होती. 
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

केएल राहुल आयपीएलमध्ये खेळताना दिसणार

DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 29 धावांनी पराभव केला

Ranji Trophy 2024:मुंबईने तामिळनाडूचा पराभव करत 48व्यांदा रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली

संजू सॅमसनने पूर्ण केले अपंग मुलाचे स्वप्न

पुढील लेख
Show comments