आयपीएलच्या प्ले ऑफ शर्यतीत घोडदौड करीत असलेले किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात आज (शुक्रवारी) शेख जायेद स्टेडियमवर करो या मरो'चा सामना रंगणार आहे.
या दोन्ही संघाला स्पर्धेतील पुढचा प्रवास करण्यासाठी हा सामना जिंकण्याशिवाय अन्य पर्याय नाही. पंजाबने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत आणि सहा जिंकून बारा गुण प्राप्त केले आहेत. हा संघ गुणतालिकेत चौथ्यास स्थानी आहे. राजस्थानने बारापैकी पाच सामने जिंकले आहेत तर सातमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. दहा अंकासह हा संघ सातव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांना प्ले ऑफमध्ये जाण्याची आशा आहे.
पंजाबने मागील पाच सामन्यात शानदार प्रदर्शन केले आहे. लगोपाठ पाच विजय मिळवून त्यांनी स्पर्धेतील आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. जर त्यांनी उर्वरित दोन सामने जिंकले तर हा संघ प्ले ऑफमध्ये जाऊ शकतो. राजस्थानसाठी मात्र हा रस्ता तितकासा सोपा नाही. या संघाला दोन्ही सामने तर जिंकावे लागतीलच, शिवाय पंजाब, कोलकाता नाइट राडर्स आणि सनराइजर्स हैदराबादांच्या पराभवावर देखील अवलंबून आहे.
राजस्थानने मगच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघावर मात केली होती. मुंबईविरुद्ध बेन स्टोक्सने जो फॉर्म दाखवला तो पंजाबसाठी डोकेदुखी ठरू शकतो. संजू सॅमसननेही त्याला उत्तम साथ दिली होती. राजस्थान या दोन्ही फलंदाजांकडून हीच अपेक्षा ठेवून आहे. शिवाय सलामीचा फलंदाज रॉबिन उथप्पाला सूर सापडावा अशीही आशा आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जोस बटलर हेदेखील चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत. राजस्थानच्या गोलंदाजांनी मुंबईविरुद्ध निराश केले होते.
राहुल आणि ख्रिस गेल सातत्याने धावा काढत आहेत. मनदीप सिंहने गेल्या सामन्यात शानदार अर्धशतकीय खेळी करीत संघाला विजय मिळवून दिला होता. निकोलस पुरनलाही सूर सापडला आहे. पंजाबच्या सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. राजस्थानला कमी धावसंख्येत रोखू शकतील.
सामन्याची वेळ सायंकाळी
7.30 वाजता.