आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील रणसंग्रामाला १९ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेचे सर्व सामने दुबई, अबुधाबी, शारजा या तीन मैदानांवर खेळवण्यात येणार आहेत...
कडक उन्हात खेळवण्यात येणाऱ्या डबल हेडर सामन्यांची संख्या कमी करण्यासाठी १० ऑक्टोबरला होणारा अंतिम सामना १५ ऑक्टोबरला खेळवण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

भारतीय खेळाडूंना यूएईत दाखल झाल्यावर तीन दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. तथापि इंग्लंड दौरा संपवून खेळाडू थेट दुबईत येणार असल्याने त्यांना कोरोना नियमांमधून सवलत दिली जाण्याची शक्यता आहे.
सध्या बीसीसीआय प्रेसिडेंट सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सीईओ हेमांग अमीन, कोषाध्यक्ष अरुण धुमाळ व आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल हे आयपीएलच्या उर्वरीत पर्वाला अंतिम मोहोर देण्यासाठी यूएईत आहेत.