इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने तीन सामने खेळले आहेत. त्यापैकी एकात चेन्नईने पराभव तर दोनमध्ये विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जने शानदार पुनरागमन करत पुढचे दोन सामने जिंकले. सलामीवीर फलंदाज रुतुराज गायकवाडच्या बॅटला आग लागली आहे. मात्र चेन्नई सुपर किंग्जबाबत तामिळनाडू विधानसभेत वेगळाच गदारोळ झाला आहे. विधानसभेतील पट्टाली मक्कल पक्षाच्या (पीएमके) आमदाराने चेन्नईवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
पट्टाली मक्कल पक्षाचे आमदार म्हणतात की CSK तामिळनाडूचा आहे पण या संघात तामिळनाडूचा एकही खेळाडू नाही. त्यामुळे या संघावर बंदी घालावी. 11 एप्रिल रोजी तामिळनाडू विधानसभेत क्रीडा अर्थसंकल्पावर चर्चा होत होती, त्यादरम्यान पट्टाली मक्कलचे आमदार व्यंकटेश्वरन यांनी चेन्नई संघावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
PMKचे आमदार व्यंकटेश्वरन म्हणतात
'चेन्नई सुपर किंग्ज हा तामिळनाडूचा संघ आहे. ज्यामध्ये एकही तामिळ खेळाडू नाही. त्यामुळे या संघावर बंदी घातली पाहिजे. तामिळनाडूमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत, जे चांगली कामगिरी करत आहेत, मात्र एकाही खेळाडूला चेन्नई संघात स्थान दिले जात नाही. तर संघात इतर राज्यांतील खेळाडूंना अधिक महत्त्व दिले जाते. हे दुर्दैवी आहे, त्यामुळे तामिळनाडू सरकारने या संघावर बंदी घालावी.