Marathi Biodata Maker

केदार जाधवची अचानक एन्ट्री; ‘या’संघातून पुनरागमन

Webdunia
मंगळवार, 2 मे 2023 (07:18 IST)
आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू डेविड विली दुखापतग्रस्त झाल्यामुळे आयपीएलमधून बाहेर गेला आहे. आरसाबीने डेविड विलीची रिप्लेसमेंट जाहीर केली आहे. मराठमोळ्या केदार जाधवला आरसीबीने आपल्या ताफ्यात घेतले आहे. (ipl 2023 rcb named kedar jadhav as replacement for david willey)
 
आयपीएलच्या यंदाच्या लिलावत केदार जाधव अनसोल्ड राहिला होता. त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. जिओ सिनेमासाठी केदार जाधव मराठीतून कॉमेंट्री करत होता. उर्वरित आयपीएल सामन्यासाठी केदार जाधवला बंगळुरूने आपल्या ताफ्यात घेतले आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात डेविड विली याने फक्त तीन सामने खेळले आहेत. या तीन सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या आहेत.
 
केदार जाधव याने २०१० मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने ९३ आयपीएल सामन्यात ११९६ धावा केल्या आहेत. केदार जाधव याआधीही बंगळुरूचा संघाचा सदस्य होता. केदार जाधव याला आरसीबीने एक कोटी रुपयांना विकत घेतले होते. केदार जाधव याने बंगळुरूसाठी सतरा सामने खेळले आहे. बंगळुरूचा मध्यक्रम सध्या ढेपाळत आहे. त्यामुळे अनुभवी फलंदाजाला आरसीबीने आपल्या ताफ्यात घेतले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

स्मृती मानधनासोबत वेळ घालवण्यासाठी जेमिमा रॉड्रिग्जने WBBL सोडले

मुंबई इंडियन्सने या खेळाडूला 6 पट किमतीत खरेदी केले

महिला T20लीगचे वेळापत्रक जाहिर

IND vs SA Test "आम्ही एकजूट राहू आणि पुनरागमन करू," दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्लीन स्वीप केल्यानंतर शुभमन गिल म्हणाला

टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये का? आदित्य ठाकरे आयसीसीच्या वेळापत्रकावर बोलले

पुढील लेख
Show comments