आयपीएलच्या 16व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने विजयाने सुरुवात केली आहे. त्यांनी पहिल्याच सामन्यात पाचवेळचा विजेता संघ मुंबई इंडियन्सचा पराभव केला.आरसीबीचा पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध गुरुवारी (६ एप्रिल) ईडन गार्डन्सवर होणार आहे. त्या सामन्यापूर्वी संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. युवा फलंदाज रजत पाटीदार संपूर्ण हंगामासाठी बाहेर राहिला आहे.
पाटीदार स्पर्धेतून बाहेर पडण्याची भीती आधीच वर्तवली जात होती. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पुनर्वसनात आहे.गेल्या हंगामात पाटीदारने चांगली खेळी खेळली होती . त्याने आठ सामन्यांच्या सात डावात 333 धावा केल्या होत्या. यादरम्यान रजतची सरासरी 55.50 होती. पाटीदारने 152.75 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याने शतक झळकावले होते.
रजत पाटीदार बाहेर असल्याची माहिती आरसीबीने दिली. त्याने ट्विटमध्ये लिहिले की, “दुर्दैवाने रजत पाटीदार टाचेच्या दुखापतीमुळे IPL 2023 मधून बाहेर पडला आहे. रजत लवकर बरा व्हावा अशी आमची इच्छा आहे. संपूर्ण टीम त्याच्या पाठीशी उभी आहे. रजतच्या बदली खेळाडूबाबत प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
रजत पाटीदारने आयपीएलमध्ये आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 40.4 च्या सरासरीने आणि 144.29 च्या स्ट्राईक रेटने 404 धावा केल्या आहेत. त्याच्या खात्यात एक शतक आणि दोन अर्धशतके आहेत. रजतच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 52 सामन्यांत 45.72 च्या सरासरीने 3795 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 11 शतके आणि 22 अर्धशतके झळकावली. रजतच्या नावावर 51 लिस्ट ए सामन्यात 1648 धावा आहेत. त्याने तीन शतके आणि आठ अर्धशतके केली आहेत.