राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना बुधवारी अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे.
एलिमिनेटर सामन्यापूर्वी, विराट कोहलीला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ज्यामुळे आरसीबीने त्याचा एकमेव सराव सामना रद्द केला होता. याशिवाय सामन्यापूर्वी पत्रकार परिषद झाली नाही. एका अहवालात ही बाब समोर आली आहे.
आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना 22 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. या सामन्यातील पराभूत संघ बाहेर पडेल तर अन्य संघ क्वालिफायर-2 मध्ये सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे.
रिपोर्टनुसार, विराट कोहलीला धमक्या मिळाल्या होत्या त्यामुळे आरसीबीने सराव सामना आणि पत्रकार परिषद रद्द केली. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात पोलिसांनी सोमवारी रात्री अहमदाबाद विमानतळावरून चार संशयितांना अटक केली. मात्र, अद्याप दोन्ही संघांकडून अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून राजस्थान आणि बेंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आरसीबीने सराव सत्र रद्द केले. यासोबतच दोन्ही संघांनी पत्रकार परिषदही रद्द केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुजरात पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. ते दहशतवादी असल्याचा पोलिसांना संशय आहे.
राजस्थान आणि बंगळुरूचे संघ बाद फेरीत खेळतील. हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो असा असेल. हा सामना जो जिंकेल त्याचा सामना दुसऱ्या क्वालिफायरमध्ये सनरायझर्स हैदराबादशी होईल. एलिमिनेटर सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेबाहेर जाईल. IPL 2024 चा दुसरा क्वालिफायर 24 मे रोजी खेळवला जाईल. यानंतर स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नई येथे खेळवला जाईल.