इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने शनिवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 10 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात अँडरसन इंग्लंडकडून शेवटच्या वेळी मैदानात उतरणार आहे. 41 वर्षीय वेगवान गोलंदाजाने वैयक्तिक निवेदनाद्वारे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) आपल्या निर्णयाची माहिती दिली.
निवृत्तीची घोषणा करताना अँडरसन म्हणाला, मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, या वर्षी जुलैमध्ये लॉर्ड्सवर खेळली जाणारी कसोटी हा माझा या फॉरमॅटमधील शेवटचा सामना असेल. 20 वर्षे माझ्या देशासाठी खेळणे हा माझ्यासाठी एक अद्भुत प्रवास होता. मला लहानपणापासून हा खेळ खेळायचा होता. मी इंग्लंडसाठी मैदानात उतरणार नाही. परंतु मला माहित आहे की पुढे जाण्याची आणि इतर लोकांना त्यांची स्वप्ने साध्य करू देण्याची ही योग्य वेळ आहे कारण त्यापेक्षा चांगली भावना नाही.
मी हे डॅनिएला, लोला, रुबी आणि माझ्या पालकांच्या पाठिंब्याशिवाय मी हे सर्व करू शकलो नसतो. मी या सर्व लोकांचे आभार मानतो.मी माझ्या प्रशिक्षक आणि खेळाडूंचे आभार मानतो. आयुष्यात पुढे येणाऱ्या आव्हानांसाठी मी उत्सुक आहे. मला एवढे वर्ष पाठिंबा दिल्यासाठी सर्वांचे आभार मानतो.
अँडरसनने मे 2003 मध्ये सुरू झालेल्या कारकिर्दीत इंग्लंडकडून 194 एकदिवसीय आणि 19 टी-20सह 187 कसोटी सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेट्ससह, ते ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न (708) आणि श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (800) नंतर सर्वकालीन सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. अँडरसन हा कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज आहे.