मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यातील सामना पावसामुळे प्रत्येकी 16 षटकांचा करण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. KKR संघाने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य दिले होते.या सामन्यात इशान किशनने मुंबई इंडियन्सकडून झेल घेत एक मोठा विक्रम केला असून त्याने क्विंटन डी कॉकला मागे टाकले आहे
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध इशान किशनने रिंकू सिंगचा झेल घेतला. यासह ईशान मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा यष्टिरक्षक बनला आहे. यष्टीरक्षक म्हणून त्याने मुंबई इंडियन्सकडून 48 बाद केले आहेत. इशान किशनने क्विंटन डी कॉकला मागे टाकले आहे.
2016 पासून इशान किशनआयपीएलमध्ये खेळत आहे.यंदा तो मुंबई संघाकडून खेळात आहे. या पूर्वी तो गुजरात कडून खेळला आहे. त्याने 103 आयपीएल सामन्यांमध्ये एकूण 2590 धावा केल्या आहेत ज्यात 16 अर्धशतकांचा समावेश आहे.त्याने आयपीएलमध्ये 249 चौकार आणि 117 षटकार मारले आहेत.