फेसबुकने काँग्रेस प्रमाणेच भाजपच्या भाजपच्या नमो अॅपशी संबंधित एका आयटी कंपनीचे फेसबुकवरील १५ पेजेस आणि अकाउंट डिलिट केली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने खोट्या बातम्या आणि माहिती पसरविणाऱ्या फेसबुक अकाउंटची साफसफाई सुरू केली आहे. यासाठीच फेसबुकने हे पाऊल उचलले आहे. 'सिल्व्हर टच' असं या आयटी फर्मचे नाव असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो अॅपशी संबंधित ही कंपनी आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस पाठोपाठ भाजपच्या नमो अॅपशी संबंधित सिल्व्हर टच कंपनीचे खोटी पेजेस हटविण्यात आली आहेत.
ही कंपनी फेसबुकवर भाजपशी संलग्न असलेल्या 'द इंडिया आय' नावाचं पेज चालवते. सिल्व्हर टचने फेसबुकवरील जाहिरातीसाठी ४८ लाख रुपये खर्च केले आहेत.