अमेरिकेसह जगभरात मायक्रोसॉफ्टचे सर्व स्टोअर्स बंद होणार आहेत. आता कंपनी डिजिटल स्टोअरवर लक्ष देणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, Microsoft.com, Xbox आणि Windows च्या महिन्याच्या एक्टिव यूजर्सची संख्या १९० बाजारपेठांमधून १.२ अब्ज आहे.
तसेच मायक्रोसॉफ्टने आपले स्टोअर कायमचे बंद होण्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही, तसेच किरकोळ स्टोअरमध्ये उपलब्ध असलेल्या सेवा ग्राहकांना ऑनलाइन दिल्या जातील हे निश्चितपणे सांगितले आहे. कंपनीने म्हटले आहे की, त्याची ऑनलाईन विक्री सातत्याने वाढत आहे त्यामुळे आम्ही किरकोळ स्टोअरच्या तुलनेत ग्राहकांना ऑनलाइन चांगली सेवा देत आहोत.