Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सायबर गुन्हेगारांपासून सावध राहा!

Webdunia
सोमवार, 27 जुलै 2020 (10:00 IST)
ई-सीमचा वापर करणाऱ्यांना महाराष्ट्र सायबरचे आवाहन
ई सिम धारकांनी सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे. त्यांच्या फसव्या फोनला बळी पडू नये. यासाठी काळजी घ्यावी,असे आवाहन महाराष्ट्र सायबर तर्फे  करण्यात येत आहे. सध्या बाजारात नवीन प्रकारचे फोन आले आहेत त्यामध्येच e -सिम किंवा embedded सिमकार्ड असते. हे e -सिमवाले फोन जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला physical सिमकार्डची गरज नसते व तुम्ही e -सिम activate करून पाहिजे ते मोबाईल नेटवर्क योग्य शुल्क भरून वापरू शकता. सध्या सायबर गुन्हेगार या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग विशेषतः airtel मोबाईल कंपनीच्या ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी करत आहेत.
 
फसवणूक
सायबर गुन्हेगार #१२१ या airtel च्या नंबरवर स्वतःचा ई-मेल id हा ग्राहकांच्या नावाने अपडेट करतात व सदर ग्राहकाच्या नावाने e -सिमकार्ड issue करून घेतात. तसेच QR कोडचा वापर करून ते e -सिम activate करून घेतात. त्यानंतर त्या ग्राहकाला एक sms येतो व लिंक असते ज्यावर क्लिक केल्यास एक फॉर्म उघडतो व त्यात तुमची सर्व आर्थिक माहिती जसे की बँक खात्याचा नंबर क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर पिन नंबर सर्व विचारले जातात. सायबर भामटे त्यांच्या फोन मध्ये तुमच्या नावाचे e -सिम वापरून मग तुमची सर्व बँक खात्यातील रक्कम ट्रान्सफर करून तुमची फसवणूक करतात.
 
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि,
१) कृपया गरज नसल्यास हे e -सिम activate करू नका.
२) कोणताही ई-मेल id तुमचा ई-मेल id म्हणून देऊ नका.
३)शक्यतो सोशल मीडियावर तुमचा मोबाईल फोन नंबर ठेवू नका.
४) जर तुम्हाला असे e -सिम बद्दल काही फोन आले, तर कृपया लगेच कंपनीच्या कॉल सेंटरला फोन करून त्याची खातरजमा करून घ्या.
५) इंटरनेटवरील कोणत्याही फॉर्मवर तुमच्या बँक खात्याची माहिती डेबिट/क्रेडिट कार्ड नंबर,पिन नंबर देऊ नका .
 
केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये.
 
असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभाग विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे मार्फत करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुती175 हून अधिक जागा जिंकणार अजित पवारांचा दावा

मुंबईत तरुणीला ओलिस ठेवून तरुणाने केला बलात्कार,पीडितेचा प्रायव्हेट पार्ट जाळला

महाराष्ट्रात ड्राय डे, या महिन्यात 5 दिवस दारूविक्री होणार नाही

काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवार निलंबित

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुढील लेख
Show comments