प्रत्येकाच्या फोनमध्ये जीपे, पेटीएम, फोन पे अशी ऑनलाइन पेमेंट अॅप्स असतात. यामाध्यमातून पेमेंट केलं जातं. मात्र फोन चोरीला गेल्यानंतर या अॅप्स मळे फसवणूक होण्याचा धोकाही वाढतो. अशा वेळी तुम्ही ही पेमेंट अॅप्स ब्लॉक करू शकता.
ही अॅप्स ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला संबंधित अॅपच्या हेल्पलाइनवर फोन करावा लागेल. इथे काही पर्याय दिसतील किंवा तुम्हाला ग्राहकप्रतिनिधीशी संपर्क साधायला सांगितलं जाईल. फोनवरील सूचनांचं पालन करून तुम्ही तुमचं खातं ब्लॉक करू शकता आणि कोणत्याही फसवणुकीच्या शक्यतांना फाटा देऊ शकता.