सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल (BSNL) रिचार्जसाठी अनेक टॉप -अप व्हाउचर्स ऑफर करते. BSNL कडे 5,500 रुपयांपर्यंतचे टॉप-अप व्हाउचर्स आहे. या मध्ये वापरकर्त्यांना पूर्ण टॉकटाइम मिळतो. आज आम्ही सांगत आहोत की या सरकारी टेलिकॉम कंपनीमध्ये कोणते असे व्हाउचर आहेत, ज्या मध्ये यूजर्सला पूर्ण टॉक टाइम मिळतो.
पूर्ण किंवा फुल टॉक टाइम देणारा 100 रुपयांचा सर्वात स्वस्त व्हाउचर-
BSNL चा सर्वात स्वस्त आणि उत्कृष्ट टॉप- अप व्हाउचर 100 रुपयांचा आहे. बीएसएनएलच्या या 100 रुपयांच्या व्हाउचर मध्ये फुल टॉक टाइम मिळतो. या व्हाउचर साठी हे ऑफर 31 मार्च 2021 पर्यंतच मिळत आहे. या नंतर या 100 रुपयांच्या टॉप-अप व्हाउचर मध्ये 81.75 रुपयांचे टॉक टाइम मिळेल.
याच मध्ये दुसरे ऑफर आहे 550 रुपयांच्या व्हाउचर साठी. कंपनीने 1 डिसेंबर 2020 पासून या व्हाउचर मध्ये ऑफर देण्यास सुरू केले आहे. सध्या कंपनीने हे ऑफर संपण्याची कोणतीही तारीख दिलेली नाही. या व्हाउचर्स मध्ये देखील पूर्ण टॉक टाइम उपलब्ध आहे.
फुल टॉकटाईम देणारे BSNL चे पुढील व्हाउचर 1,100 रुपयांचे आहे. या व्हाउचरमध्ये 1 डिसेंबर 2020 नंतर फुल टॉक टाइम मिळणे सुरू झाले आहेत. सध्या तरी या व्हाउचरची कोणतीही काल बाह्यता तारीख नाही.
बीएसएनएलच्या 2,000 रुपयांच्या या टॉप-अप व्हाउचर मध्ये देखील यूजर्सला पूर्ण टॉक टाइम उपलब्ध आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बीएसएनएल कडे अनेक महाग व्हाउचर्स आहेत, ज्यामध्ये कंपनी पूर्ण टॉकटाईम देत आहे. फक्त 2,010 च्या टॉप-अप व्हाउचर्स मध्ये पूर्ण टॉकटाईम उपलब्ध नाही.