Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

वायफाय राऊटरची देखभाल

वायफाय राऊटरची देखभाल
स्मार्टफोनचा वापर वाढल्यापासून घराघरांत वायफाय राऊटर दिसू लागले आहेत. वायफायमुळे वेगाने आणि अधिक प्रमाणात इंटरनेट वापरता येते. मात्र वायफाय राऊटरची देखभाल ठेवणेही अधिक महत्त्वाचे आहे.
 
अनेक घरांध्ये वायफाय 24 तास सुरू असते. गरज नसेल तर वायफाय राऊटर बंद ठेवावे. गरज नसतानाही नेहमी वायफाय राऊटर सुरू ठेवले तर त्याचे आयुर्मान कमी होते.
 
पावसाळ्यात वायफाय राऊटर बंद पडण्याची शक्यता अधिक असते. पावसाळ्यातील वातावरणामुळे इंटरनेट सिग्रल मिळण्याची शक्यता कमी असते. अशा वेळी तज्ज्ञांना बोलावूनच त्याची दुरुस्ती करून घ्यावी. शक्यतो सिग्नल अँटिनाला हात लावून सिग्नल बिघडू देऊ नका.
 
विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस सुरू असेल तर वायफाय राऊटर बंद करा. राऊटरच्या सिग्नल यंत्रणेचा विजेशी संपर्क आल्यास राऊटर बंद पडू शकतो.
 
राऊटरला लहान मुलांचा हात लागेल अशा ठिकाणी ठेवू नका. शक्यतो भिंतीवर अडकवून ठेवावा.
 
धुळीमुळे राऊटर खराब होऊ शकतो. राऊटर आठवड्यातून एकदा साफ करा. स्वच्छ कापड किंवा कॉटर स्वॅबच्या साहाय्याने राऊटरवरील धूळ साफ करू शकता.
 
वायफाय राऊटरची रेंज तुमच्या घरापुरती मर्यादित ठेवावी. ज्यामुळे बाहेरील व्यक्ती तुमच्या नेटवर्कमध्ये अ‍ॅक्सेस करून सिस्टिम हॅक करू शकणार नाही.
 
राऊटरचा पासवर्ड काही महिन्यांनंतर बदलावा. पासवर्डमध्ये अक्षरे, अंक असावेत. काही स्पेशल कॅरॅक्टरही असावेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टोयोटाने २६२८ वाहने परत मागविली