Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

‘गूगल'च्या मदतीने हटवा फोनमधील कचरा

‘गूगल'च्या मदतीने हटवा फोनमधील कचरा
, बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (13:57 IST)
आपल्यापैकी अनेक असे अँड्राइड यूजर असतील की त्यांचा फोन हेवी झाला असेल किंवा सारखा हँग होत असेल. अनेकदा तर फोन स्लो होतो. कारण अशा फोनची मेमरी फूल झालेली असते. म्हणून मोबाइलला मोकळा श्वास घेता यावा म्हणून गूगलने नवीन फाइल गो अॅलप लाँच केले आहे. या अॅपच्या मदतीने आपण फोनमधील स्पेस मोकळी करू शकतो आणि फाइल शेअर करण्यासारखे काम पार पाडू शकतो.
 
फाइल्स गो हे अॅप आपण सहजपणे गूगल प्ले स्टोअरमधून डाउनलोड करू शकतो. हेअॅप अॅपलच्या फाइल शेअरिंग अॅसप एअरड्रॉपप्रमाणे काम करते. या मदतीने आपण कोणत्याही अँड्राइड डिव्हाइसवर मोठमोठ्या फाइल शेअर करू शकता. याशिवाय फोनच्या मदतीने डुप्लिकेट फाइल, न वापरण्यात येणारे अॅप आणि कमी रिझॉल्यूशनचे व्हिडिओ सहजपणे काढून टाकू शकता. तसे पाहिले तर गूगलने या अॅपला अॅड्राइड ओरियोचे लाइट व्हर्जन अँड्रायग गोसाठी लाँच केले. मात्र अॅंड्राइड लॉलीपॉप 5.0 किंवा त्यापेक्षा वरच्या व्हर्जनच्या मोबाइलमध्ये या अॅपचा वापर करू शकतो. या अॅपचा आकार केवळ 5 एमबी आहे. या माध्यमातून आपण आपल्या फाइल्स क्लाउडवर देखील स्टोअर करू शकता.
राधिका बिवलकर
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'या' अॅपवरून दिवाळीत 1 रुपयांत खरेदी करता येणार सोनं