suvichar

फेसबुकवर आधारकार्ड माहितीची विचारणा, पण सक्ती नाही

Webdunia
फेसबुकवर आता नव्याने खाते काढायचे असेल तर तुम्हाला आधारची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे, पण त्याची सक्ती केलेली नाही. फेसबुकवर आधारची माहिती विचारण्यात आल्याचा स्क्रीनशॉट एका वापरकर्त्यांने रेडिटवर टाकला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये फेसबुकने आधारची माहिती विचारल्याचे दिसत आहे. वापरकर्त्यांचे नाव पहिले नाव, आडनाव हे आधारकार्डवर असेल तसेच सांगावे लागते. 

फेसबुकचे प्रमुख मार्क झकरबर्ग यांनी सांगितले, की आम्ही मर्यादित वापरकर्त्यांना ही माहिती केवळ चाचणीचा भाग म्हणून विचारत आहोत. जरी आधार कार्डची माहिती विचारण्यात येत असली तरी त्याची सक्ती करण्यात आलेली नाही. फेसबुकवर जे नाव आहे तेच नाव  लोकांनी सगळीकडे वापरावे असे आम्हाला वाटते व त्यामुळे मित्र व कुटुंबीय जोडले जाऊ शकतात. ही अगदी छोटी चाचणी आहे. यात अतिरिक्त भाषेची सोय दिली आहे. आधारची माहिती दिल्याने मित्र त्यांना फेसबुकवर लगेच ओळखू शकतील. लोकांनी फेसबुकवर जसे नाव आहे तसे आधारवर देण्याची सक्ती नाही असे प्रवक्त्याने सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

पंढरपूर वारीसाठी एसटीची मोठी योजना, राज्य परिवहन महामंडळाने ५,५०० बसची व्यवस्था केली

गिरीश महाजन महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होणार! 'हॉटलाइन' टीकेला एकनाथ खडसे यांचे प्रत्युत्तर

मध्यरात्री जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

बँकॉकमधील पबमध्ये भीषण आग, २७ जणांचा मृत्यू तर अनेक गंभीर जखमी

दाऊदने ताजमध्ये बॉम्ब ठेवला! मध्यरात्रीच्या फोनमुळे मुंबईत खळबळ

पुढील लेख
Show comments