Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

सर्वाधिक सर्च झालेला शब्द 'फेमिनिजम'

सर्वाधिक सर्च झालेला शब्द 'फेमिनिजम'
गूगल आणि इंटरनेटवर चालू वर्षी 'फेमिनिजम' हा शब्द सर्वाधिक सर्च झाला आहे. यंदा 'मी टू' या मोहिमेने जगभरात प्रसिद्धी मिळवली. हॉलिवूडमधून लैंगिक अत्याचाराविरूद्धच्या मोहिमेला सुरूवात झाली. जात, धर्म, भाषा यांच्या पलिकडे जाऊन अनेक स्त्रिया एकवटल्या. हॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी 'फेमिनिझम' बाबत आपली मतं व्यक्त केली. त्यामुळे जगभरात या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी चळवळ सुरू झाली आहे. 
 
फेमिनिजम पाठोपाठ 'कॉम्प्लिसिट' ,'डोटड' ,'जायरो'.'इम्पथी' हे शब्द सर्च केले गेले. किम जॉंग उन  या कोरियाच्या हुकुमशहाने 'डोटड' हा शब्द डोनाल्ड ट्रम्पसाठी वापरला होता. त्यामुळे 'डोटड' या शब्दाबाबत लोकांच्या मनात खूपच उत्सुकता आहे. 'डोटड' चा अर्थ वाढत्या वयासोबत मानसिक संतुलन ढासळत गेलेली व्यक्ती असा होतो.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नॉन क्रिमिलेअर उत्पन्नाची मर्यादा ६ लाख रुपयांवरून ८ लाख रुपये