Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Flipkart ने लाँच केला पहिला लॅपटॉप, 17 जानेवारीनंतर विक्रीसाठी उपलब्ध

Flipkart ने लाँच केला पहिला लॅपटॉप, 17 जानेवारीनंतर विक्रीसाठी उपलब्ध
, सोमवार, 13 जानेवारी 2020 (16:11 IST)
ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टने आपला पहिला लॅपटॉप Falkon Aerbook लाँच केला आहे. फ्लिपकार्टने ‘MarQ by Flipkart’ या ब्रँडअंतर्गत लॅपटॉप आणला असून याची किंमत 39,990 रुपये इतकी आहे. 
 
हा लॅपटॉप 17 जानेवारीनंतर फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. Falkon Aerbook लॅपटॉप इंटेल आणि माइक्रोसॉफ्टसह भागीदारी करुन विकसित करण्यात आला आहे. कंपनीप्रमाणे भारतीय युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन हा लॅपटॉप विकसित करण्यात आला आहे.
 
या लॅपटॉपचे वैशिष्ट्ये 
13.3 इंच डिस्प्ले 
Intel 8th Gen core i5 प्रोसेसर
8 जीबी रॅम आणि 256 जीबी सॉलिड-स्टेट स्टोरेज असून एक्स्ट्रा एसडीडी स्लॉटच्या मदतीने 1 टीबीपर्यंत वाढवता येईल. 
37W-hr बॅटरी, 5 तासांचा बॅकअप
 
कंपनीप्रमाणे ग्राहकांच्या प्रतिक्रिया बघून Falkon Aerbook मध्ये बेस्ट इन-क्लास फीचर्स देण्यात आले आहेत म्हणून हा लॅपटॉप व्हॅल्यू फॉर मनी डिव्हाइस ठरेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Instagram ने वापरकर्त्यांसाठी अपडेट जाहीर केली आहेत, टिकटॉक अ‍ॅप सारख्या फीचर्सचा पाठिंबा मिळेल