Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

Webdunia
सोमवार, 26 मार्च 2018 (11:59 IST)
सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व अनुभव पोस्ट करण्यात आणि इतरांना जाणून घेण्यास उत्सुक दिसून येतो. मात्र सोशल मीडियामुळे तरुण पिढीच्या आरोग्यावर होणार्‍या परिणामांबाबत क्वचितच कुणी विचार केला असेल. हल्लीचझालेल्या एका अध्ययनानुसार, सोशल मीडियाच्या वापराचा किशोरवयीन मुलांच्या तुलनेत किशोरवयीन तरुणींच्या आरोग्यावर जास्त प्रतिकूल परिणा होतो. 
 
युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेस आणि यूसीएल विापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या या अध्ययनात असे आढळून आले की, प्रारंभित किशोरावस्थेत (दहा वर्षे) सोशल मीडियावर घालविलेल्या वेळेचा नंतरची किशोरावस्था म्हणजे 10-15 वर्षांच्या वयातील चांगले आरोग्य यांच्यात एक संबंध आहे. सोशल मीडियाचे सुरुवातीच्या आकर्षणावर नजर ठेवणे गरजेचे आहे, खासकरून मुलींच्या बाबतीत. कारण त्याचा मुलींची किशोरावस्था व बहुधा त्या प्रौढ झाल्यावरही मोठा परिणाम होत असतो. किशोरावस्थेत मुलांच्या तुलनेत मुली सोशल मीडियावर जास्त वेळ खर्च करतात. 13 वर्षांच्या वयात सोशल मीडियामध्ये मुली मुलांपेक्षा एक जास्त वेळ घालवत होत्या. अर्थात वाढत वयासोबत मुले व मुलींच्या सोशल मीडियावर वेळ घालविण्यामध्ये वाढ झाली आहे. मात्र तेव्हाही मुली थोड्या जास्तच वेळ सोशल मीडियावर देतात. 59 टक्के मुली व 46 टक्के मुले सोशल मीडियावर रोज एक तास वा त्याहून जास्त वेळ घालवितात, असेही शास्त्रज्ञांना आढळून आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

पेपरफुटी विरोधी विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केले

महाराष्ट्रामध्ये १ सप्टेंबरपर्यंत ओला-उबर-रॅपिडोसाठी नोंदणी करणे अनिवार्य

LIVE: नागपूरमध्ये एका भीषण रेल्वे अपघातात दोन भावांचा मृत्यू

अमरावती, अकोला आणि वर्धा पुढील २४ तासांसाठी सतर्कतेचा इशारा

अमरावतीत अंधश्रद्धेच्या कळस,पोटदुखीवर उपाय म्हणून १५ दिवसांच्या मुलीला गरम विळाने चटके

पुढील लेख
Show comments