rashifal-2026

गुगलने या अॅप्सवर बंदी घातली, आपल्या फोन मधून त्वरित डिलिट करा

Webdunia
सोमवार, 11 जुलै 2022 (19:40 IST)
Android Malware: गुगलने प्ले स्टोअरवरून चार अॅप काढून टाकले आहेत. या अॅप्समध्ये जोकर मालवेअर आढळून आला आहे.  तुमच्या फोनमध्ये हे अॅप्स असतील तर लगेच डिलीट करा.जोकर व्हायरस पुन्हा आला आहे. या व्हायरसची लागण झालेले असे काही अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर होते. त्यामुळे अनेकांनी असे धोकादायक अॅप डाऊनलोड केले आहेत.  यामध्ये जोकर व्हायरस आढळून आला आहे, जो अँड्रॉइड यूजर्ससाठी धोकादायक ठरू शकतो.  
 
जोकर व्हायरस पहिल्यांदा 2017 मध्ये दिसला होता. सायबर गुन्हेगारांसाठी ही एक अतिशय लोकप्रिय आहे. याद्वारे ते अँड्रॉइड यूजर्सना टार्गेट करतात. सायबर सुरक्षा संशोधकाने याबाबत इशारा दिला आहे.  
 
रिपोर्टनुसार, गुगल प्ले स्टोअरवरील अनेक अॅप्समध्ये जोकर मालवेअर आढळले आहेत. हे अॅप्स 100,000 हून अधिक वेळा इन्स्टॉल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
 
अहवालात असे म्हटले आहे की Google Play Store वरील स्मार्ट एसएमएस संदेश, ब्लड प्रेशर मॉनिटर, व्हॉईस लँग्वेज ट्रान्सलेटर आणि क्विक टेक्स्ट एसएमएस अॅप्समध्ये जोकर मालवेअर आढळले आहेत.  
 
रिसर्च टीमने गुगलला याची माहिती दिली, त्यानंतर हे अॅप्स प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहेत. हे अॅप्स काढण्याच्या प्रक्रियेपूर्वी 1 लाखाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहेत. याचा अर्थ अनेक लोकांची उपकरणे धोक्यात आहेत.  तुम्हीही हे अॅप्स डाऊनलोड केले असतील, तर तुम्ही ते लगेच डिलीट करावेत. याशिवाय फोनचा पासवर्ड बदलणे आवश्यक आहे.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

'माझ्यावर भुताची सावली'! लँडिंगच्या आधीच अदनानने आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा केला प्रयत्न; प्रवासी भीतीने किंचाळले

एमसी मेरी कोम व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये प्रवेश करू शकते स्वतःच दिले संकेत

महाराष्ट्राच्या पाणीपुरवठा विभागाला मोठा सन्मान

LIVE: महाराष्ट्राच्या पाणीपुरवठा विभागाला मोठा सन्मान

नागपूर महानगरपालिकेचा ७५ वा वर्धापनदिन, शहराला ७५ नवीन उद्याने आणि ७५ खेळाची मैदाने मिळणार

पुढील लेख
Show comments