Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एअरटेलकडून 999 रुपयात हॉटस्पॉट

Webdunia
सोमवार, 18 डिसेंबर 2017 (11:35 IST)
भारती एअरटेल कंपनीने फोरजी हॉटस्पॉट 999 रुपये इतक्‍या किमतीत उपलब्ध केला आहे. एअरटेल फोरजी हॉटस्पॉट ग्राहकांना एकाच वेळी लॅपटॉप्स, स्मार्टफोन्स, टॅब्लेट्‌स, स्मार्ट उपकरणे जोडण्याची हाय स्पीड इंटरनेटला जोडण्याची मुभा देतो. त्यामुळे ग्राहकांना उत्तम सुविधा आणि लवचिकता प्राप्त होते. हे उपकरण पूर्णतः संरक्षित अशा नेटवर्कवरून सुरक्षित असा डेटा अनुभव देते. एअरटेल फोरजी हॉटस्पॉट एअरटेलच्या सर्व रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. ग्राहक लवकरच एअरटेल फोरजी हॉटस्पॉट ऍमेझॉन इंडियावरूनही खरेदी करू शकतील.
 
भारती एअरटेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अजय पुरी म्हणाले, एअरटेलच्या देशभर पसरलेल्या प्रबळ हाय स्पीड डेटा नेटवर्कच्या बळावर एअरटेल फोरजी हॉटस्पॉट ग्राहक कुठेही असताना दर्जेदार मल्टी-डिव्हाइस ऑनलाइन अनुभव देतो. एअरटेल फोरजी हॉटस्पॉटची सेवा चालू करण्यासाठी ग्राहकांना एअरटेल फोरजी सिम घ्यावे लागेल आणि ते विविध पोस्टपेड आणि प्रीपेड प्लान्समध्ये गरजेनुसार प्लान निवडू शकतील. एअरटेल भारतातल्या सर्व 22 टेलिकॉम सर्कल्समध्ये फोरजी सेवा पुरवते. एअरटेलची फोरजी नेटवर्क सेवा उपलब्ध नसल्यास, एअरटेलचा फोरजी हॉटस्पॉट आपोआप थ्रीजी सेवेकडे वळतो जेणेकरून ग्राहकांना विनाव्यत्यय ऑनलाइन अनुभव मिळू शकेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

नवीन

LIVE: मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये आढळलेल्या अस्वच्छ परिस्थितीबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला फटकारले

इंडियन रॉयल्स आणि पाकिस्तान पँथर्स संघ २ ऑगस्ट रोजी आमनेसामने येणार

Maharashtra Zilla Parishad Elections महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद निवडणुका होणार!

PM मोदींच्या विरोधात मॉर्फ केलेल्या पोस्टविरोधात मोठी कारवाई! अनेक सोशल मीडिया अकाउंट्सविरोधात एफआयआर दाखल

'लाडकी बहीण' योजनेची अंतिम यादी जाहीर; e-KYC मुळे ६६ लाख अर्जदार अपात्र, आता १.६६ कोटी महिलांनाच मिळणार दरमहा १५०० रुपये

पुढील लेख
Show comments