Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर धान्याच्या दाण्याएवढे लहान आहे. आयबीएमने लास वेगासच्या एका इवेंटदरम्यान मायक्रो मायक्रो कॉम्प्युटर दुनियेसमोर मांडले. कंपनीप्रमाणे हे दुनियेतील सर्वात लहान कॉम्प्युटर आहे. हे अँटी फ्रॉड डिव्हाईस रूपात वापरले जातील. यात एक चिप आहे. या चिपमध्ये प्रोसेसर, मॅमरी आणि स्टोरेजसह पूर्ण कॉम्प्युटर सिस्टम आहे. पाच वर्षात हे कॉम्प्युटर उपलब्ध करण्याची योजना आखली जात आहे.
 
कंपनीकडून हे डिव्हाईस एक अँटी फ्रॉड डिव्हाईस असल्याचा दावा केला जात आहे. याने अशी तंत्र विकसित करण्यात येईल ज्याने प्रॉडक्ट्सवर तकनीकने वाटर मार्क लावले जाऊ शकतात. याने फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये कमी येईल. या कॉम्प्युटरची किंमत मात्र 7 रुपये असेल.
 
हे खूपच स्वस्त असतील आणि हे वापरून अनेक प्रॉडक्ट्स सुरक्षित केले जाऊ शकतील. आयबीएम पाच तंत्र वि‍कसित करत आहे, क्रिप्टो अँकर व ब्लॉक चेन, लेटिस क्रिप्टोग्राफिक अँकर, एआय बायस, एआय पावर रोबोट मायक्रोस्कोप आणि क्वांटम कॉम्प्युटर. वन स्वॉयर मिलिमीटर साइजच्या या डिव्हाईसला आयबीएमने क्रिप्टो अँकर प्रोग्राम अंतर्गत तयार केले आहे. आणि याच कारणामुळे याला अँटी फ्रॉड डिव्हाईस नाव देण्यात आले आहे.
 
कंपनीने दावा केला आहे की या डिव्हाईसच्या मदतीने फॅक्टरीहून निघणारे प्रॉडक्ट्स कन्झ्यूमरकडे पोहचेपर्यंत त्यासोबत होणार्‍या छेड रोखली जाऊ शकेल. काला बाजारी आणि खाद्य समस्या सोडविण्यासाठी प्रॉडक्टमध्ये क्रिप्टोग्राफिक्स अँकर लावले जाऊ शकतात, ज्याने सप्लाय चेनमध्ये होणारी चुकामूक लगेच धरली जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ईपीएफओच्या ऑफिसमध्ये कोट्यवधींचा घोटाळा