Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 16 May 2025
webdunia

हुश्श फेसबुक, व्हॉट्सअप आणि इस्टाग्राम पूर्ववत झाले

instagram-facebook-messenger-and-whatsapp-issue-has-since-been-resolved
, गुरूवार, 4 जुलै 2019 (09:40 IST)
जगभरात फेसबुक, व्हॉट्सअप आणि इस्टाग्राम हे अॅप तब्बल 9 तासांनी पुन्हा पूर्ववत झाले आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास काहींना फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर फोटो लोड होण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे ट्विटवर तक्रारीचा अक्षरश: पाऊस पडला.
 
मात्र त्यानंतर आज (4 जुलै) पहाटे डाऊन झालेले फेसबुक, व्हॉट्सअप आणि इस्टाग्राम हे अप पुन्हा पूर्ववत झाले आहेत. “काल काहींना फोटो, व्हिडीओ आणि इतर फाईल्स पाठवताना आणि डाऊनलोड होताना तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र नुकतंच आम्ही ही समस्या सोडवली आहे. त्यामुळे तुम्ही आता पहिल्यासारखंच फोटो, व्हिडीओ आणि इतर गोष्टी डाऊनलोड करु शकता, असे ट्विट फेसबुकने अधिकृतरित्या केले आहे.”

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वंचित बहुजन आघाडीने आता विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात