Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'इंस्टाग्राम' चे टिकटॉकसारखे ‘रील्स’ नावाचे नवीन फीचर

Webdunia
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (08:43 IST)
फेसबुकने इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मसाठी टिकटॉकप्रमाणे ‘रील्स’ (Reels) नावाचं नवीन फीचर आणलं आहे. याद्वारे युजर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर 15 सेकंदाचे छोटे व्हिडिओ शेअर करु शकतील.
 
इंस्टाग्रामने भारतात नवीन शॉर्ट व्हिडिओ फीचर रील्स लाँच केलं आहे. कंपनी Reels फीचर गेल्या वर्षीपासून ब्राझिलमध्ये टेस्ट करत होती, त्यासोबतच फ्रान्स, जर्मनी आणि भारतातही गेल्या महिन्यात या फीचरची टेस्टिंग सुरू झाली होती. आता हे फीचर कंपनीने अधिकृतपणे लाँच केलं आहे. Instagram च्या या नव्या सर्व्हिसमध्ये टिकटॉकप्रमाणे अनेक फीचर्स मिळतील. याद्वारे युजर्स अ‍ॅपवर व्हिडिओ बनवू शकतात, क्रिएटिव्ह फिल्टर आणि म्युजिक अ‍ॅड करुन शेअर करु शकतात. यामध्ये टिकटॉकप्रमाणे लोकप्रिय गाणे, ट्रेंड किंवा चॅलेंजसह 15 सेकंदाचा व्हिडिओ बनवता येतो. यासाठी म्युजिक लाइब्रेरीमधून ऑडियो, स्पीड, इफेक्टस आणि टाइमरचे ऑप्शन उपलब्ध आहेत. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये बदल करु शकतात किंवा व्हिडिओचा स्पीडही कंट्रोल करता येतो. व्हिडिओ बनवल्यानंतर युजर्स आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर करु शकतात. इंस्टाग्रामचं हे फीचर अ‍ॅपमध्येच आहे, त्यामुळे यासाठी नवीन अ‍ॅप डाउनलोड करावं लागत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

वर्षाच्या अखेरीस होऊ शकतात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; प्रभाग रचना प्रक्रिया सुरू

भारतात कोविडचे २५७ रुग्ण आढळले

छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

LIVE: नेते छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

महाराष्ट्रात नवीन गाडी खरेदी करणे झाले कठीण, राज्य सरकारने बनवला नवा नियम

पुढील लेख
Show comments