rashifal-2026

4 जी इंटरनेटसाठी जिओ थेट सॅटेलाईटची मदत घेणार

Webdunia
बुधवार, 12 सप्टेंबर 2018 (11:11 IST)
खेड्यापाड्यात आणि दूर अंतराच्या ठिकाणीही 4 जी इंटरनेट सेवा मिळण्यासाठी रिलायन्स जिओ आता थेट सॅटेलाईटची मदत घेणार आहे. ईस्त्रा आणि ह्यूग्स कम्युनिकेशनच्या मदतीने जिओ लवकरच सॅटेलाईट आधारित इंटरनेट नेटवर्क सेवा सुरू करणार आहे.
 
उद्योगपती मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ 400 हून अधिक एलटीई साईट्सला जोडणार आहे. या साईट्स सध्याच्या नेटवर्क कनेक्शनच्या बाहेर आहेत. जिओ या साईट्सच्याजवळ सॅटेलाईट सेटअप उभारणार असून त्यासाठी ह्यूग्स कम्युनिकेशनला 10 मिलीयन डॉलरचे कंत्राट देण्यात आले आहे. हिंदुस्थानातील टेलिकॉम कंपन्या टॉवर्सला जोडण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करती होती. कारण फायबर ऑप्टिक्सद्वारे कनेक्शन जोडणे खूपच महागात पडू शकते. मात्र डोंगराळ भागात या मायक्रोवेव्ह कनेक्शनही खूपच तापदायी ठरते. त्यामुळे जिओने ग्रामीण भागात नेटवर्कसाठी सॅटेलाईटचा ऑप्शन आणला आहे.
 
ह्यूग्ससोबत भागिदारी करणाऱया जिओने मुंबई आणि नागपूर येथे दोन अर्थ स्टेशन सुरू करण्याची योजना आखली आहे. तसेच लेह आणि पोर्ट ब्लेअरमध्ये मिनी हब सुरू होणार असून याद्वारे लेह, लडाख, अंदमान, लक्ष्यद्वीपमध्ये चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबई लोकल प्रवाशांना सतर्कता, रविवारी अनेक मार्गांवर मेगा ब्लॉक

दीपिका पदुकोणने मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत व्यक्त केली चिंता; BMC कडे चौकशी आणि कारवाईची मागणी

MS धोनी शेवटची मॅच खेळणार?

अकोल्यात नवरीने घोड्यावर स्वार होऊन दिला समान हक्कांचा संदेश

देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कारागृहाबाहेर

पुढील लेख
Show comments