Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

...म्हणजे आता व्हाट्सअ‍ॅप चॅट देखील सुरक्षित नाही

...म्हणजे आता व्हाट्सअ‍ॅप चॅट देखील सुरक्षित नाही
, शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (11:00 IST)
सध्या सोशल मीडिया चा सर्रास पणे वापर करण्यात येत आहे. लोकं फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम, वापरतात. त्यात व्हाट्सअ‍ॅप खूप वापरण्यात येतं. पण आपल्याला माहित आहे का की हे व्हाट्सअ‍ॅप जे आपण वापरतो हे सेफ नाही. आपले या वरील चॅट कोणी ही वाचू शकतं. या पूर्वी व्हाट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्याने सांगितल्यावरून की, 'व्हाट्सअ‍ॅप वरील आपले संदेश एंड-टू एंड ऍप्लिकेशनद्वारे संरक्षित केले जाते. म्हणजे आपले मेसेज सुरक्षित आहे आणि कोणतीही थर्ड पार्टी वाचू शकत नाही. 

पण अलीकडील झालेल्या सुशांतसिंह राजपूत प्रकरणातून एनसीबीने केलेल्या तपासणीतून जुन्या व्हाट्सअ‍ॅप चॅट मेसेजला मिळवून ड्रग्ज अँगलचा उल्लेख केला आहे. हे कसं शक्य झाले. तर आम्ही आपल्याया सांगू इच्छितो आहोत की लोकं आपल्या फोन नंबरने आपल्या संदेशावर प्रवेश करून व्हाट्सअप साइन करतात. लोकांचा विश्वास आहे की मोबाईलच्या फोन क्लोनिग तंत्रज्ञान वापरून संदेशात ऍक्सेस मिळवलं जाऊ शकतं. क्लोन फोन आपल्या बॅकअप चॅट मध्ये सहजरित्या प्रवेश करू शकतो आणि जिथे स्टोअर केले असतील अश्या गुगल ड्राईव्हवर जाऊ शकतं.
 
क्लोनींग म्हणजे असे तंत्र ज्याचा माध्यमातून फोनची ओळख आणि फोनमधील सर्व डेटा कॉपी करतो जरी आपल्याकडे फोन नसताना हे अ‍ॅपद्वारे सहजरित्या केले जाऊ शकतं. यामध्ये आपल्या IMEI नंबर देखील हस्तांतरित केला जाऊ शकतो. एनसीबीने सुशांत प्रकरणात कायदेशीर मार्गाने फोनमध्ये स्टोअर डेटा मध्ये प्रवेश करून व्हाट्सअ‍ॅप चॅट उघडून ड्रग अँगलची तपासणी केली आहे. या ड्रग अँगल प्रकरणात भल्या मोठ्या सेलिब्रिटी देखील अडकल्या आहेत. त्यावरून सिद्ध होते की एनसीबीने ही माहिती व्हाट्सअ‍ॅप चॅट वरून मिळवली आहे, जर एनसीबी व्हाट्सअ‍ॅप वरून माहिती मिळवू शकते तर व्हाट्सअ‍ॅप चॅट कसे काय सुरक्षित आहे?

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात आतापर्यतचा सर्वाधिक संसर्गाचा मासिक दर सप्टेंबर महिन्यात