Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Jio ने लाँच केली 5G mm वेव्ह स्पेक्ट्रम आधारित सेवा, जे उद्योगांना पूर्वीपेक्षा अधिक कार्यक्षम बनवेल

Webdunia
सोमवार, 14 ऑगस्ट 2023 (23:44 IST)
 रिलायंस जिओ  इंफ़ोकॉम लिमिटेड(Reliance Jio Infocomm Limited )ने त्यांना दिलेल्या सर्व स्पेक्ट्रम बँडच्या अटी वेळेपूर्वी पूर्ण केल्या आहेत.
 देशातील 22 दूरसंचार मंडळां मधील जिओ ग्राहक आता 26 GHz mm वेव्ह बिझनेस कनेक्टिव्हिटी वापरत आहेत
 जगातील पहिले व्यावसायिक FR-2 स्टँडअलोन mm वेव्ह तंत्रज्ञान रोल आउट
 हे देशात विकसित झालेले True 5G मिलिमीटर वेव्ह तंत्रज्ञान आहे, यामुळे इंटरनेटचा वेग अधिक वेगवान होईल, ब्रॉडबँड देखील चांगला होईल.
 बँकिंग, शिक्षण, आरोग्य आणि सरकारी संबंधित संस्थांसह अनेक उद्योगांनी याचा वापर सुरू केला आहे
 हे 2 GBPS चा अल्ट्रा-हाय स्पीड प्रदान करत आहे
 रिलायन्स जिओ जगातील सर्वात वेगवान 5G आणत आहे जे या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल
 
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने स्पेक्ट्रम बँडशी संबंधित सर्व परवानाधारक सेवा क्षेत्रांमध्ये रोल आउट करून किमान आवश्यकता पूर्ण केल्याची घोषणा केली आहे. स्पेक्ट्रम घेताना, जिओने वचन दिले होते की ते 17 ऑगस्ट 2023 पर्यंत हे लक्ष्य पूर्ण करेल, परंतु चांगली गोष्ट म्हणजे जिओने अंतिम मुदतीपूर्वी आपले लक्ष्य गाठले.
 
19 जुलै 2023 रोजी, जिओने या आवश्यकतांचा टप्पा-1 पूर्ण केला होता आणि 11 ऑगस्ट रोजी दूरसंचार विभागाने सर्व मंडळांमध्ये त्याची चाचणी देखील केली होती.
जिओने लो बँड, मिड बँड आणि एमएम वेव्ह स्पेक्ट्रमचे संयोजन मिळवले आहे आणि डीप-फायबर नेटवर्क आणि स्वदेशी तंत्रज्ञानावर बनवलेले प्लॅटफॉर्म यांचे संयोजन जिओला प्रत्येक नागरिकापर्यंत 5G पोहोचवण्याचे वचन पूर्ण करण्यात मदत करेल.
 
जिओचा स्पेक्ट्रम फूटप्रिंट देशातील सर्वात मजबूत आहे. मिलीमीटर वेव्ह बँडमध्ये (26 GHz), जिओ कडे सर्व 22 मंडळांमध्ये 1000 MHz उपलब्ध आहे. याच्या आधारे, जिओ  एंटरप्राइझसाठी सर्वात शक्तिशाली सेवा देऊ शकते आणि त्याच वेळी ते उच्च दर्जाची स्ट्रीमिंग सेवा देखील देऊ शकते.
 
जगातील सर्वात वेगवान 5G रोलआउट यशस्वी करण्यासाठी जिओ चे अभियंते रात्रंदिवस काम करत आहेत. भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, “स्वातंत्र्याचा अमृतकाल” या निमित्त  mm-wave वर आधारित Jio True 5G ची व्यावसायिक कनेक्टिव्हिटी राष्ट्राच्या  सुपूर्द करत आहे.
 
जिओला विश्वास आहे की mm-wave स्पेक्ट्रमसह स्टँडअलोन तंत्रज्ञानामुळे लाखो लहान, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना खरी 5G बिजिनेस-कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात सक्षम होईल.
 
यावेळी बोलताना रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे ​​अध्यक्ष श्री आकाश अंबानी म्हणाले,
 
“आम्ही भारत सरकार, दूरसंचार विभाग आणि देशातील 140 कोटी लोकांना 5G अधिक वेगाने आणण्याचे वचन दिले होते. आज आपण अभिमानाने सांगू शकतो की, जगातील सर्वात वेगवान रोल आउट करून, भारताला आघाडीवर आणण्यात आपण महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यासह, आम्ही 5G च्या किमान गरजा पूर्ण करण्याचे लक्ष्य देखील पूर्ण केले आहे.
 
गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी आम्हाला 5G स्पेक्ट्रम मिळाला होता. तेव्हापासून, आमची टीम या वर्षाच्या अखेर पूर्वी देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या सर्व नागरिकांना 5G सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. हे जगातील सर्वात वेगवान 5G रोलआउट आहे जे भारताला जगाच्या 5G नकाशावर आघाडीवर ठेवेल.
 
5G मिमी व्हेव  म्हणजे अधिक बँडविड्थ आणि कमी लेंटन्सी. एकूणच एक उत्तम इंटरनेट अनुभव. उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक अॅप्सवर काम करणार्‍या उद्योगांना हे समजेल की जिओ आता सुविधा देत आहे ते पूर्वी कोणत्याही वायरलेस नेटवर्किंग तंत्रज्ञानात नव्हते.
 
एमएम वेव्ह सोल्युशन्सच्या लीज्ड लाइन सेवा व्यवसायातही वाढ होईल कारण जिओ लाखो लघु आणि मध्यम उद्योगांना मजबूत कनेक्टिव्हिटी आणि उत्कृष्ट कार्यप्रदर्शन देईल आणि उत्कृष्ट निश्चित लाइन सेवा प्रदान करेल.आपल्याला हे जाणून आनंद होईल की हा स्पेक्ट्रम 2GBPS चा अल्ट्रा-हाय-स्पीड ब्रॉडबँड प्रदान करेल.
 
मिलिमीटर वेव्ह तंत्रज्ञानाचा थेट अर्थ असा आहे - तो 5G स्पीड जो तुम्ही अजून पाहिला नसेल. जुने अॅप्स असो किंवा नवीन,जिओ  करोडो उपकरणांना ती गती देईल ज्याद्वारे तुम्ही तुमचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकाल. या स्पेक्ट्रमद्वारे हेवी डेटा पॅकेट्स आणि अनेक प्रकारची माहिती क्षणार्धात तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. यामुळे देशातील लाखो लघु व मध्यम उद्योग कायमचे बदलतील आणि यश त्यांच्या पायांचे चुंबन घेईल.
 



Edited by - Priya Dixit    
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi मोदी सरकार वक्फ कायद्यात सुधारणा करणार, अमित शहांची घोषणा

येमेनच्या हुथी बंडखोरांचा अमेरिकन युद्धनौकांवर ड्रोन-क्षेपणास्त्रांनी हल्ला

Maharashtra Elections 2024: मोदी सरकार वक्फ कायद्यात सुधारणा करणार, अमित शहांची घोषणा

उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणी प्रकरणावर भाजपचे प्रत्युत्तर

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा T20 कधी होणार जाणून घ्या

पुढील लेख
Show comments