Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Jio ची नवीन धमाल, आता बोटांवर जगभरातील सर्व बातम्या

Webdunia
दूरसंचार क्षेत्रात नवीन क्रांतिकारक रिलायन्स जिओने आता 'जिओ न्यूज' सुरू करण्याची घोषणा केली आहे. जिओ न्यूज मोबाइल ऍप्लिकेशन सोबतच वेब आधारित सेवांवर देखील असेल. हा अॅप Google Play Store आणि Apple App Store वर ग्राहकांना उपलब्ध होईल. हा प्लॅटफॉर्म 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे.
 
कंपनीने ही सेवा सुरू करताना म्हटलं की देशात सर्वसाधारण निवडणुकांसह काही राज्यांसाठी देखील निवडणुका सुरू आहे. याशिवाय, विविध प्रमुख कार्यक्रमांसह इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू आहे आणि पुढे 2019 वर्ल्ड कप स्पर्धा देखील सुरू होईल. जिओ न्यूजवर वापरकर्ते सहजच या सर्व गोष्टींची ताजी माहिती मिळवू शकतील.
 
रिलायन्स जिओने असे म्हटले आहे की 'जिओ न्यूज' हा वन स्टॉप सोल्युशन आहे ज्या माध्यमातून ग्राहकांना ब्रेकिंग न्यूज, लाइव्ह टीव्ही, व्हिडिओ, मासिके, वृत्तपत्र आणि बरेच काही याबद्दल माहिती मिळेल. जिओ न्यूज येथे प्रत्येक क्षण ब्रेकिंग न्यूज, देशाचे अग्रगण्य आणि लोकप्रिय 150 पेक्षा जास्त वृत्त चॅनेलांचे थेट प्रसारण, 800 पेक्षा जास्त मासिके आणि 250 हून अधिक वृत्तपत्रांच्या माहिती व्यतिरिक्त देशाचे आणि परदेशाचे लोकप्रिय ब्लॉग आणि न्यूज वेबसाइट देखील ग्राहकाच्या एका बोटावर राहतील. ग्राहकांना स्वारस्य असलेल्या क्षेत्रांमध्ये देखील वैयक्तिकरित्याने मुख्यपृष्ठ निवडता येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

मुंबईत फसवणुकीच्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश, 19 जणांना अटक

पोलिस स्टेशनचा प्रमुख सांगून कॉलर म्हणाला- दोन एसी पाठवा, खाकीच्या नावावर अशी फसवणूक

रेल्वे स्थानकावर मोठा बॉम्बस्फोट, 24 जण मृत्युमुखी

नांदेडमध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षावर समाज तोडल्याचा आरोप

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : पंतप्रधान मोदींचा अकोल्यात काँग्रेसवर हल्लाबोल

पुढील लेख
Show comments