Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 16 May 2025
webdunia

'ट्वीटस्नॅप', ट्विटरच्या नवीन अपडेटबद्दल जाणून घ्या

microblogging site
, मंगळवार, 19 मार्च 2019 (18:02 IST)
मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने कॅमेरा डिझाइन संबंधित एक नवीन अपडेट लॉन्च केले आहे. यामुळे वापरकर्त्यास कॅमेर्‍यावर नवीन फीचर मिळतील. नवीन डिझाइन अंतर्गत फोटो, व्हिडिओ आणि थेट व्हिडिओ कॅप्चर करणे आणि त्यावर संदेश लिहिणे सोपे होईल. ट्विटरचे हे अपडेट रोल-आऊट आधारावर आहे, ज्या अंतर्गत हळूहळू सर्व फोनपर्यंत हे फीचर पोहोचतील. 
 
ते वापरण्यासाठी वापरकर्त्यास ट्विटर अॅप उघडल्यानंतर स्क्रीनवर उजवीकडून डावीकडे स्वाइप करावे लागेल. यानंतर कॅमेरा उघडेल. फोटो किंवा व्हिडिओ तयार केल्यानंतर त्यावर टेक्स्ट लिहिण्याचा पर्याय देखील येईल. यात रंगीत लेबल्स लावण्याची सुविधा देखील आहे. याचा आणखी एक फायदा म्हणजे आता मीडिया फाइल जास्त मोठी आणि स्वच्छ दिसतील. आतापर्यंत फोटो ट्विट करण्यापूर्वी ते एका लहान बॉक्समध्ये दिसायचे.
 
* इंस्टाग्रॅमशी टक्कर नाही - हे नवीन ट्विटर अपडेट न तर फोटो सेक्शनसाठी आणि न तर फोटो शेअरिंग साइट इन्स्टाग्रॅमशी टक्कर घेण्यासाठी आणले गेले आहे. ट्विटरच्या मते, या अपडेटमुळे मायक्रोबब्लॉगिंग साइट ट्विटर आपल्या प्लॅटफॉर्मवर रिअल टाइम लेन्स यासारख्या सुविधा देण्यास इच्छुक आहे. आतापर्यंत ट्विटमध्ये फोटो / व्हिडिओ लावण्यासाठी दीर्घ प्रक्रिया स्वीकारावी लागते.
 
* असे कार्य करते - ट्विटरमध्ये स्नॅपचॅट प्रमाणे कॅमेरा पर्याय दिला गेला आहे, ज्यामध्ये स्क्रीनवर खाली शटर बटण आहे. फोटो घेण्यासाठी शटर बटणावर फक्त एक स्पर्श करावे लागेल जेव्हाकी व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी शटर बटण दाबून ठेवावे लागेल. तिथेच ट्विटर लाइव्ह करण्यासाठी शटर बटण दाबल्यानंतर हळूच उजवीकडे किंवा डावीकडे करावे लागेल. तथापि सध्या कंपनीने यात स्टिकर आणि इतर फिल्टरचा पर्याय दिलेला नाही.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

4 जीबी रॅमसह Poco F1 Lite येण्याची शक्यता