Festival Posters

चीनमध्ये पर्यटक नजरकैदेत : फोनमध्ये जबरदस्ती केला जातोय मॅलवेअर

Webdunia
शुक्रवार, 5 जुलै 2019 (14:27 IST)
चीनमध्ये बाहेरच्या देशातून येणार्‍या पर्यटकांना नजरकैदेत ठेवण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. चीन या पर्यटकांना नजरकैदेत ठेवण्यासाठी त्यांच्या स्मार्टफोनमध्ये जबरदस्तीने अँड्रॉइड मॅलवेअर इन्स्टॉल करत आहे. मॅलवेअरच्या मदतीने चीनसाठी यूजर्सच्या मोबाइलमधील मेसेज आणि अन्य फाइलही हाताळणे शक्य झाले आहे. चीनमध्ये होणार्‍या या जबरदस्तीला अनेक वृत्तपत्र आणि मीडिया हाउसने दुजोरा दिला आहे.
 
चीनच्या शिनजियांग शहरात येणार्‍या पर्यटकांना स्मार्टफोनमध्ये मॅलवेअर इन्स्टॉल करण्यास सांगितले जात आहे. तसेच, शिनजियांग शहरातून परतल्यानंतर तेथील सुरक्षा रक्षक पर्यटकांच्या मोबाइलमधील मॅलवेअर अनइन्स्टॉल करतात. अलीकडेच 'द गार्डिअन'च्या हाती एक स्मार्टफोन लागला असून, त्या फोनमध्ये हा मॅलवेअर इन्स्टॉल केलेला आढळून आला. यानंतर न्यूयॉर्क टाइम्स, व्हॉइस, आणि एका जर्मन ब्रॉडकास्टर एनडीआर या सर्वांनी मिळून मॅलवेअरच्या केलेल्या तपासणीत ही माहिती उघड झाली आहे.
 
सेलहंटर नाक हा मॅलवेअर यूजर्सच्या वैयक्तिक डेटा चोरीसहित स्मार्टफोनमधील अन्य फाइल्सही पूर्ण स्कॅन करतो. यात ईमेल, कॉन्टॅक्ट, मेसेज, फोन लॉग, कॅलेंडरसहित अन्य माहितीचाही सामावेश आहे. याबरोबर चिनी एजन्सीना फोनच्या लोकेशनबद्दलही संपूर्ण माहिती मॅलवेअर अ‍ॅपमार्फत मिळते.
 
माहिती गोळा करण्याबरोबर हा अ‍ॅप स्मार्टफोनमधील चीन सरकारच्या दृष्टीने संशयित असलेल्या 70 हजारहून अधिकफाइल्स स्कॅन करतो. यात एपी 3 फाइलसहित दहशतवादी संघटनांचे फोटो आणि व्हिडिओचाही सावेश आहे.
 
हा डेटा सीमेवरील कार्यालयाच्या लोकल सर्व्हरमध्ये स्टोअर केला जातो. मॅलवेअर अ‍ॅपच्या मदतीने चिनी पर्यटकांची हालचाल सुद्धा ट्रॅक केली जात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप याचे पुरावे मिळालेले नाहीत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

मुलाचा मृतदेह पाहून आईने सोडले प्राण; एकाच वेळी निघाल्या दोन्हींच्या अंत्ययात्रा, जाता-जाता समाजासमोर ठेवला आदर्श!

सोलापूर अपघातावर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला मृतांच्या कुटुंबीयांना ७ लाख रुपयांची मदत जाहीर

LIVE: झटपट गोरेपणा मिळवा, आता फसवणूक करणारे अडचणीत येणार! FDA ची सौंदर्यप्रसाधनांवर कारवाई

ब्रिटिश पंतप्रधानांकडून मोठी घोषणा, १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी

नीट पुनर्परीक्षेचा पेपरफुटीच्या नावाखाली सायबर फसवणूक करणाऱ्या टेलिग्राम टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

पुढील लेख
Show comments