व्हॉट्सअॅप युझर्ससाठी आता नवे फीचर्स आले आहे. ज्यापैकी एक फीचर माईकचे असणार आहे. हा माईक व्हॉट्सअॅप किबोर्डवर दिसेल. हा माईक मेसेज टाईप करण्यासाठी आहे. या फीचरचा वापर तुम्ही मेसेज टाईप करण्यासाठी करु शकता. तुम्हाला फक्त बोलायचं आहे आणि मेसेज टाईप होईल. हे ऑटो टायपिंग सारखं आहे. सध्या गुगल असिस्टंट आणि व्हॉईस सर्चचा जमाना आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपनेही आता आपले व्हॉईस टायपिंग फीचर आणले आहे. हे फीचर व्हॉट्सअॅपमध्ये इनबिल्ट देण्यात आले आहेत.
अँड्रॉइडमध्ये व्हॉट्सअॅप व्हर्जन 2.19.11 मध्ये हे फीचर देण्यात आले आहे. हा माईक आयकॉन व्हॉट्सअॅपच्या किबोर्ड अॅपमध्ये आहे. या आयकॉनवर टॅप करुन बोलायचं आहे, त्यानंतर मेसेज आपोआप टाईप होऊन जाईल. iOS मध्ये हे फीचर किबोर्डच्या उजव्या बाजूने असेल तर अँड्रॉइडमध्ये हे किबोर्डच्या वरच्या बाजूला असेल. इंग्रजीत टाईप करण्यासाठी हे फीचर तुमच्या खूप कामी येऊ शकतं, मात्र याच्या मदतीने तुम्ही हिंदी किंवा मराठीत टाईप करु शकत नाही.