Festival Posters

ट्विटर यूजरसाठी नवा नियम, स्पॅम मेसेजवर नियंत्रण

Webdunia
गुरूवार, 11 एप्रिल 2019 (09:16 IST)
4
ट्विटरच्या नव्या निर्णयाच्या नियमांनुसार कुठलाही ट्विटर यूजर एका दिवसांत ४०० हून अधिक नव्या हँडल्सला फॉलो करू शकणार नाही. स्पॅम मेसेज पाठविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने ट्विटरने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यापूर्वी ही मर्यादा एक हजार एवढी होती. ट्विटरच्या सुरक्षा समूहाने यासंदर्भात ट्विट केले आहे. फॉलो करू शकणाऱ्या अकाऊंटची संख्या हजार वरून ४०० इतकी करण्यात आली आहे. 
 
स्पॅम संदेशावर नियंत्रण आणल्यामुळे यूझर्सना कुठलाही त्रास होणार नसल्याचे ट्विटरने म्हटले आहे. बॉट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोगॅमद्वारे काही वेळा ट्विटर अकाऊंटस चालवली जातात. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात खऱ्या अकाऊंटना फॉलो केले जाते. त्यामुळे या बॉट अकाऊंटच्या फॉलोअर्सची संख्या वाढते. अशा अकाऊंटवरून ट्विट किंवा संदेशाच्या स्वरुपात अनेक लिंक किंवा मार्केटिंगचा मजकूर पाठवला जातो. असे स्पॅम रोखण्यासाठी ट्विटरने नियमांत हे नवे बदल केले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईला लवकरच नवीन महापौर मिळणार

राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणावर शरद पवारांचे मोठे विधान; अजितची इच्छा पूर्ण झालीच पाहिजे

1 फेब्रुवारी 2026पासून नियम बदलणार, तुमच्या खिशावर काय होणार परिणाम

नागपूर महापौर आणि उपमहापौरांच्या नावांवरील सस्पेन्स कायम! गडकरी-फडणवीस 2 फेब्रुवारी रोजी नावांची यादी जाहीर करणार

सुनेत्रा पवार मुंबईत पोहोचल्या, आज महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार

पुढील लेख
Show comments