Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

फोन सिम कार्डसाठी नवीन नियम जारी,1जुलैपासून संपूर्ण देशात लागू

SIM card
, रविवार, 17 मार्च 2024 (16:48 IST)
फोन सिम कार्डसाठी नवीन नियम जारी करण्यात आला आहे. हा नियम भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) 15 मार्च रोजी जारी केला होता. जी 1 जुलैपासून संपूर्ण देशात लागू होणार आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्य वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
 
नवीन नियमानुसार, जर मोबाईल वापरकर्त्यांनी अलीकडेच त्यांचे सिम कार्ड स्वॅप केले असेल तर ते त्यांचा नंबर पोर्ट करू शकणार नाहीत. सिमची देवाणघेवाण करण्याच्या पद्धतीला स्वॅपिंग म्हणतात. आणि जेव्हा सिम कार्ड हरवले किंवा तुटलेले असते तेव्हा हे केले जाते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमचे जुने सिम एक्सचेंज करून तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरकडून नवीन सिम मिळवता.
 
फसवणुकीच्या घटना पाहता असे पाऊल उचलले जात आहे. सिम स्वॅपिंग किंवा बदलल्यानंतर लगेचच मोबाईल कनेक्शन पोर्ट करण्यापासून फसवणूक करणाऱ्यांना रोखणे हा या नवीन नियमाचा उद्देश आहे.
 
सिम कार्ड नवीन नियम
सिम स्वॅपिंग म्हणजे काय?
आजच्या युगात सिम स्वॅपिंगच्या फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे, ज्यामध्ये फसवणूक करणारे तुमचे पॅन कार्ड आणि आधारचा फोटो सहज शोधू शकतात. त्यानंतर मोबाईल हरवण्याच्या बहाण्याने त्यांना नवीन सिमकार्ड मिळवतात. असं करून तुमच्या नंबरवर आलेला ओटीपी फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचतो.
 
 ट्राय(TRAI) ने दूरसंचार विभागाला (DoT) एक नवीन सेवा सुरू करण्याची शिफारस केली आहे, ज्यामध्ये मोबाइल युजर्सच्या हँडसेटवर येणाऱ्या प्रत्येक कॉलचे नाव डिस्प्ले केले जाते, ते नाव कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह केले आहे की नाही. त्यामुळे फसवणुकीच्या घटनांना आळा बसू शकतो. यामुळे गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो.

Edited By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gujarat: गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहात परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला, पाच जखमी