suvichar

चॅनेल निवडीसाठी ट्रायचे नवे अॅप

Webdunia
सोमवार, 28 जानेवारी 2019 (09:01 IST)
ट्रायच्या नव्या अॅपमुळे डीटीएच आणि केबल युजर्ससाठी चॅनेल निवडीची प्रक्रिया सोपी होणार आहे. अॅपमुळे ग्राहक आपल्या आवडीचे चॅनेल निवडू शकणार आहेत, सोबतच यावेळी त्यांना यासाठी किती पैसे मोजावे लागतील याचीही माहिती मिळेल. सुरुवातीला तुम्ही अॅपच्या सहाय्याने चॅनेल्स निवडा. यानंतर अॅप तुम्ही निवडलेल्या चॅनेल्सची यादी दाखवेल. एकदा निवड संपली की अॅप तुम्हाला यासाठी किती पैसे मोजावे लागतील याची माहिती देईल.
 
हे अॅप वापरण्यासाठी ट्रायच्या बेवसाइटवर जावं लागेल. चॅनेल सिलेक्शन पेजवर जाण्यासाठी वेबसाईटवर खालील बाजूला असणाऱ्या ‘Get Started’ बटणावर क्लिक करुन काही सोप्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. तुमचं नाव, पत्ता, कोणते चॅनेल पाहण्यास आवडेल अशा प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर तुमच्यासमोर चॅनेल्सची यादी येईल. युजर्स आपल्याला हवे ते चॅनेल्स यावेळी निवडू शकतात. तुमच्या निवडीच्या आधारे ट्राय यासाठी किती पैसे मोजावे लागतील याची माहिती देईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

मराठी ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी शिकणे अनिवार्य; १५ ऑगस्टनंतर कारवाई होणार

देशांतर्गत स्पर्धेतून माघार घेतल्याने मनिका बत्रा अडचणीत, आशियाई क्रीडा स्पर्धेतूनही बाहेर

७ धावांनी पिछाडीवर असूनही बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला चांगलेच झुंजवले

LIVE: राज्य सरकारने ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण अनिवार्य केले

वडिलांसाठी फादर्स डे निमित्त घरच्या घरी हॉटेलसारखा भव्य बेत; येथे पहा रेसिपीज

पुढील लेख
Show comments