Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

WhatsApp मध्ये आला नवीन फीचर, फेवरेट चॅटला ठेवू शकता टॉप वर

favourite chats will be on top in whatsapp
, मंगळवार, 2 मे 2017 (14:16 IST)
WhatsApp परत आपल्या यूजर्ससाठी नवीन फीचर Pin to Top Chat घेऊन आला आहे. यात आम्ही आमच्या फेवरिट चॅट किंवा ज्यांच्याशी आम्ही फ्रिक्वेंटली चॅट करतो त्याला सर्वात वर ठेवू शकतो. सध्या WhatsApp वर सतत मेसेज आल्याने ज्याच्याशी आम्ही चॅट करत असतो तो मागे जातो. पण हा फीचर आल्यानंतर असे नाही होणार.  
 
या फीचरला यूज करण्यासाठी आम्ही ज्या फ़्रेंडशी वारंवार गोष्टी करतो, त्याच्या नावावर टॅप करावे लागेल. टॅप केल्याने तुम्हाला एक पिन (बोर्ड पिनप्रमाणे) दिसेल त्यावर टॅप केल्याने तो नंबर Pin होऊन जाईल. या प्रकारे आम्ही तीन नंबराला Pin करू शकतो. Pin झाल्यानंतर हे तीन नंबर सर्वात वर राहतील. दुसरे मेसेज आलेतरी हे नंबर वरच राहतील.  
 
टेस्टिंगसाठी बीटा वर्जनमध्ये उपलब्ध
सध्या हे फीचर एंड्रॉइडच्या बीटा वर्जनसाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही या फीचरला यूज करण्यास इच्छुक असाल तर गूगल प्ले स्टोअरहून WhatsApp चा बीटा वर्जन डाउनलोड करून साइन अप करा. लवकरच ही सुविधा सर्व यूजर्ससाठी उपलब्ध होईल.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या मंदिर जाण्यासाठी पुरुषांना नेसावी लागते साडी