Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ola Electric Scooter Delivery: ओला इलेक्ट्रिक स्कूटी ची डिलिव्हरी सुरु ,जाणून घ्या वैशिष्टये

Webdunia
बुधवार, 15 डिसेंबर 2021 (19:04 IST)
ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग करणाऱ्या लोकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. अनेक वेळा पुढे ढकलल्यानंतर, कंपनीने ओला इलेक्ट्रिक स्कूटीची डिलिव्हरीआज 15 डिसेंबर पासून सुरु केली आहे. कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची खेप प्लांटमधून वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठवली आहे. 
कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी प्लांट सोडल्याचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. त्यांनी यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे... "गाडी निघाली आहे."  
 
ओलाने आपली इलेक्ट्रिक स्कूटर या वर्षी ऑगस्टमध्ये दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली होती. ओलाने ग्राहकांना 499 रुपयांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर बुक करण्याची सुविधा दिली होती. त्यानंतर कंपनीने दावा केला की त्यांना अवघ्या दोन दिवसांत 1,100 कोटी रुपयांचे बुकिंग मिळाले आहे. Ola ने S1 ची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आणि S1 Pro ची किंमत 1,29,999 रुपये निश्चित केली आहे
 
ओला पूर्वी ऑक्टोबर मध्येच इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी सुरू करणार होती. हे अनेकवेळा पुढे ढकलावे लागले आणि कंपनी शेवटी 15 डिसेंबर रोजी वितरण सुरू केले आहे.सध्या बेंगळुरू, दिल्ली, अहमदाबाद आणि कोलकाता व्यतिरिक्त चेन्नई, हैदराबाद, कोची, मुंबई आणि पुणे येथे चाचणी ड्राइव्ह ऑफर करत आहे.
 
वैशिष्टये - या स्कूटर चे वैशिष्टये म्हणजे की आपण घरात बसवलेल्या सामान्य सॉकेट मधून देखील हे चार्ज करता येऊ शकते. स्कूटरला बुटसाठी मोठी जागाही देण्यात आली आहे. OLA S1 pro ला एक पॉवरट्रेन मिळते जी ARAI प्रमाणित  8.4 kW पीक पॉवर आणि 181 km ची रेंज देते. हायपर मोड मध्ये, S1Pro 3 सेकंदात 0-40 किमी/ताशी वेग वाढवू शकतो.
OLA S1 बद्दल बोलताना, कंपनीचा दावा आहे की गाडीची ARAI प्रमाणित रेंज 121 किमी आहे.आणि ती 90 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. OLA S1  3.6 सेकंदात 0-40 किमी/ताशी वेगाने धावू शकते.  
स्कूटर ब्लॅक, पिंक, यलो , ब्लू, व्हाईट अशा एकूण 10 कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

आपण रात्री योगा करू शकतो का?

मुलांसाठी श्री कृष्णाची सुंदर मराठी नावे अर्थासह

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल

पिगमेंटेशन काढून टाकण्यासाठी हे घरगुती फेसपॅक वापरा, त्वचा उजळेल

सर्व पहा

नवीन

धावपट्टीवर धावणाऱ्या विमानाला ब्रेक लावावे, तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाचे मुंबई-जोधपूर विमान रद्द

स्मशानभूमीतून कवटी गायब झाल्यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला, इंदूरमध्ये नेमकं घडले तरी काय?

LIVE: मुंबई पोलिसांनी सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला

मुंबईत सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पोलिसांनी एका जोडप्यासह १२ जणांना अटक केली

बसेसमध्ये देखील एअर होस्टेस असणार, विमानासारखी सुविधा मिळणार; नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments